Railway Ticket Price : नववर्षापूर्वी रेल्वे तिकीट दरात बदल, तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार प्रवास
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रेल्वे प्रशासनाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने प्रवासी तिकीट दरात बदल केला आहे. ही नवी दररचना 26 डिसेंबर पासून लागू करण्यात येणार आहे.
पुणे : रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने प्रवासी तिकीट दरात बदल केला आहे. ही नवी दररचना 26 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये काही प्रवाशांना दिलासा देण्यात आला असला तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट महाग होणार आहे. त्यामुळे नववर्ष सुरू होण्याआधी प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार आहे. चालू आर्थिक वर्षातील ही रेल्वेची दुसरी भाडेवाढ आहे. यापूर्वी जुलै महिन्यात भाड्यात सुधारणा करण्यात आली होती.
उपनगरीय रेल्वे आणि मासिक सीझन तिकिटांचे दर जैसे थे
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उपनगरीय रेल्वे तसेच मासिक सीझन तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांतील रोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय 215 किलोमीटरपर्यंतच्या सामान्य वर्गाच्या प्रवासासाठीही तिकीट दर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. मात्र 215 किलोमीटरहून अधिक अंतरासाठी सामान्य वर्गाच्या तिकिटांचे दर थोडे वाढवण्यात आले आहेत.
advertisement
या प्रवासासाठी आता प्रतिकिलोमीटर 1 पैसा अधिक आकारला जाणार आहे. तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधून नॉन-एसी प्रवास करणाऱ्यांसाठी प्रतिकिलोमीटर 2 पैशांची, तर एसी प्रवासासाठीही तेवढीच वाढ लागू होणार आहे. त्यामुळे नॉन-एसी डब्यातून साधारण 500 किलोमीटरचा प्रवास केल्यास प्रवाशाला सुमारे 10 रुपये जास्त खर्च येणार आहे.
advertisement
600 कोटींचे वाढीव उत्पन्न अपेक्षित
view commentsया नव्या दररचनेमुळे चालू आर्थिक वर्षात रेल्वेला सुमारे 600 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवा सुधारण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील खर्च सध्या सुमारे 1 लाख 15 हजार कोटी रुपये झाला आहे, तर पेन्शनवरील खर्च 60 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकूणच 2024-25 या आर्थिक वर्षात रेल्वेचा ऑपरेशनल खर्च सुमारे 2 लाख 63 हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
Location :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Railway Ticket Price : नववर्षापूर्वी रेल्वे तिकीट दरात बदल, तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार प्रवास










