सेल्फीसाठी चाहते बेभान, नॅशनल क्रश समांथासोबत धक्काबुक्की, VIDEO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नॅशनल क्रश समांथाला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. गर्दीतून बाहेर पडताना समांथासोबत धक्काबुक्की झाली. समांथाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांआधी समांथानं दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. समांथाच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण समांथाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांआधी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री निधी अग्रवाल गर्दीच अडकली होती. तिला कसबस बाहेर काढण्यात आलं. निधी अग्रवालनंतर अभिनेत्री समांथा प्रभूच्या बाबतीतही तसात प्रकार घडला आहे. समांथाला देखील गर्दीत धक्काबुक्की करण्यात आली. समांथाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू रविवारी हैद्राबाद येथे एका शॉपच्या उद्धाटनासाठी केली होती. ती तिथे खूप थांबली होती. समांथाला पाहण्यासाठी तिच्या आजूबाजूला चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. उद्घाटन करून समांथा निघाली तेव्हा समोर असलेल्या गर्दीचा सामना तिला करावा लागला. शॉपपासून कारपर्यंत जाण्यासाठी समांथाच्या नाकीनऊ आले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, समांथाच्या चारही बाजूला चाहत्यांची प्रचंड गर्दी आहे. तिच्या बॉडीगार्ड्सनी गर्दी आवरली आहे. चाहते समांथाला भेटण्यासाठी आरडाओरडा करत आहेत. त्या गर्दीतून बाहेर पडत असताना समांथाच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत आहे. इतकी धक्काबुक्की पाहून काही वेळ समांथा देखील घाबरली. पण बॉडीगार्ड्स आणि सिक्युरिटीच्या मदतीने समांथा गर्दीतून बाहेर पडली.
advertisement
समांथाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका फोटोसाठी अभिनेत्रीला अशी वागणूक देतात असं म्हणत अनेकांनी समांथाला सपोर्ट केला आहे.
advertisement
समांथानं काही दिवसांआधीच द फॅमिली मॅनचा डायरेक्टर राज निदिमोरू याच्याशी दुसरं लग्न केलं. राजचं देखील हे दुसरं लग्न आहे. समांथाचं पहिलं लग्न अभिनेत्री नागा चैतन्यबरोबर झालं होतं. नागा चैतन्यला डिवोर्स दिल्यानंतर जवळपास चार वर्षांनी समांथाने दुसरं लग्न केलं. समांथाने तिचं दुसरं लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. हैद्राबादमध्ये एका मंदिरात तिने गुपचूप लग्न उरकलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 8:15 AM IST










