advertisement

ज्या 'रन-वे'जवळ मृत्यू, त्या विमानतळासाठी ३ महिन्याआधी अजितदादांनी घेतलेला मोठा निर्णय!

Last Updated:

Ajit Pawar Baramati Airport: दृश्यमानतेमुळे धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने विमान धावपट्टीवर न उतरवता हवेतच घिरट्या घातल्या. पुढच्या दोन मिनिटांनी अंदाज घेऊन विमान धावपट्टीवर उतरवा, अशा सूचना वैमानिकाला मिळाल्या. त्यानंतरही विमान उतरवताना त्यांना धावपट्टी दिसली नाही, यावेळी मात्र त्यांचा अंदाज चुकला.

अजित पवार
अजित पवार
बारामती (पुणे) : कर्मभूमी बारामतीसाठी संबंध आयुष्यभर झिजलेल्या अजित पवार यांनी अखेरचा श्वासही बारामतीतच घेतला. मुंबईहून सकाळी बारामतीकडे झेपावलेले विमान पाऊणे नऊ वाजता पोहोचणे अपेक्षित होते. परंतु दृश्यमानतेमुळे धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने विमान धावपट्टीवर न उतरवता हवेतच घिरट्या घातल्या. पुढच्या दोन मिनिटांनी अंदाज घेऊन विमान धावपट्टीवर उतरवा, अशा सूचना वैमानिकाला मिळाल्या. त्यानंतरही विमान उतरवताना त्यांना धावपट्टी दिसली नाही, यावेळी मात्र त्यांचा अंदाज चुकला. धावपट्टीच्या काही मीटर आधीच विमान जमिनीला धडकले आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला.
बारामती विमानतळावर 'नाईट लँडिंग' (रात्रीच्या वेळी विमान उतरवणे) सुविधा सुरू करण्याबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले होते. या सुविधेमुळे केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे, सातारा आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण विकासाला एक नवी दिशा मिळणार होती.

अजितदादांनी कोणते निर्णय घेतले?

बारामती विमानतळावर 'नाईट लँडिंग' संदर्भात ऑक्टोबर २०२५ मध्ये अजित पवार यांनी मंत्रालयात एक विशेष बैठक घेऊन या प्रकल्पाला गती दिली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) तयार केलेला नाईट लँडिंगचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) कडे हस्तांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
advertisement
या सुविधेसाठी आवश्यक असणारी उपकरणे, धावपट्टीचे विस्तारीकरण आणि प्रकाश व्यवस्था (Lighting System) यासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून निधीची तरतूद करण्याची घोषणा केली होती.

नाईट लँडिंगसाठी विमानतळावर खालील बदल प्रस्तावित करण्यात आले होते:

Runway Lighting: संपूर्ण धावपट्टीवर आधुनिक 'एअरफील्ड लायटिंग सिस्टीम' बसवणे.
PAPI Lights: विमानाला उतरताना अचूक कोनाची माहिती देणारे 'Precision Approach Path Indicator' दिवे लावणे.
advertisement
Survey: एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मार्फत तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

नाईट लँडिंगसाठी अजितदादांचा का आग्रह होता?

औद्योगिक विकास: बारामती एमआयडीसीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. नाईट लँडिंग सुविधेमुळे उद्योजकांना रात्रीच्या वेळीही प्रवास करणे शक्य झाले असते, ज्यामुळे गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.
शेतीमालाची निर्यात: ग्रामीण भागातील भाजीपाला, फळे आणि फुले यांची रात्रीच्या वेळी विमानाने परदेशात किंवा इतर राज्यांत जलद वाहतूक (Cargo) करण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार होती.
advertisement
मुंबई-पुणे विमानतळावरील ताण: मुंबई आणि पुणे विमानतळावर विमानांची मोठी गर्दी असते. बारामतीमध्ये नाईट लँडिंग सुरू झाल्यास अनेक खाजगी विमाने आणि सराव विमाने येथे वळवता येतील, असा त्यांचा विचार होता.
अन्य शहरांसाठीही अजित पवार यांची आग्रही भूमिका: केवळ बारामतीच नव्हे, तर याच बैठकीत त्यांनी यवतमाळ, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर आणि नांदेड या विमानतळांवरही नाईट लँडिंग सुविधा युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या 'रन-वे'जवळ मृत्यू, त्या विमानतळासाठी ३ महिन्याआधी अजितदादांनी घेतलेला मोठा निर्णय!
Next Article
advertisement
'मी त्यांना सकाळी 6.30 वाजता कामावर जाताना पाहिलं होतं…'; अजितदादांचे PSO विदीप जाधव यांच्या मृत्यूने कळवा परिसर सुन्न
मी त्यांना सकाळी कामावर जाताना पाहिलं…; विदीप जाधव यांच्या मृत्यूने शेजारी सुन्न
  • अजित पवारांसोबत सावलीसारखे राहणारे विदीप जाधव

  • नेहमीप्रमाणे दादा कामावर गेले, पण परतलेच नाही

  • विदीप जाधव यांच्या निधनाने कुटुंब पोरकं

View All
advertisement