advertisement

'मी त्यांना सकाळी 6.30 वाजता कामावर जाताना पाहिलं होतं…'; अजितदादांचे PSO विदीप जाधव यांच्या मृत्यूने कळवा परिसर सुन्न

Last Updated:

Vidip Jadhav: आपल्या कामावर निघताना नेहमीप्रमाणे हसून हात हलवणारे विदीप जाधव आता पुन्हा कधीच दिसणार नाहीत, ही जाणीव आज कळवा परिसरातील प्रत्येक नागरिकाला रडवून गेली. अजित पवारांचे सावलीसारखे अंगरक्षक असलेले विदीप जाधव यांनी कर्तव्यावर असतानाच जगाचा निरोप घेतला आणि एका सुखी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

News18
News18
ठाणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी एक असलेले विदीप जाधव यांचाही बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार, विदीप जाधव त्यांच्यासोबत असलेली सहकारी पिंकी माळी, तसेच दोन वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक हे सर्वजण Learjet 45 या चार्टर्ड विमानातून प्रवास करत असताना, दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करताना विमान अपघातग्रस्त झाले.
या दुर्घटनेची बातमी विदीप जाधव यांच्या ठाण्यातील कळवा परिसरातील विटावा येथील वसाहतीत पोहोचताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
विदीप जाधव हे विटावा परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, 14 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. बुधवारी दिवसभर त्यांचे घर बंदच होते, कारण त्यांचे आई-वडील काही दिवसांपूर्वीच आपल्या मूळ गावी गेले होते.
advertisement
विदीप जाधव हे मनमिळाऊ, नम्र आणि अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. गेली 22 वर्षे त्यांना ओळखणाऱ्या श्रुती वाडेकर यांनी सांगितले की त्या त्यांना प्रेमाने “दादा” म्हणत. “मी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना कामावर जाताना पाहिलं होतं. अवघ्या दोन तासांत ते आपल्यातून निघून गेले, ही बातमी ऐकावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं,” असं सांगताना त्या अक्षरशः हादरलेल्या दिसत होत्या.
advertisement
जाधव यांना जवळपास 27 वर्षांपासून ओळखणाऱ्या आणखी एका शेजाऱ्याने त्या सकाळी घडलेला एक क्षण आजही डोळ्यांसमोरून जात नसल्याचं सांगितलं.
नेहमीप्रमाणे कामावर जाताना विदीप जाधव यांनी हात हलवत हसून निरोप दिला होता. हा रोजचा, साधा पण आपुलकीचा इशारा. “तो हात हलवण्याचा क्षण आजही सतत डोळ्यांसमोर फिरतोय. तेच शेवटचं दर्शन ठरेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं,” असे ते भावूक होत म्हणाले.
advertisement
दिवसभर कृष्णा विहारकडे जाणारी गल्लीत असामान्य शांतता पसरलेली होती. नेहमी गजबजलेली ही गल्ली आज शोकमग्न होती. विदीप जाधव हे केवळ आपल्या कर्तव्यनिष्ठेसाठी नव्हे, तर त्यांच्या शांत स्वभावासाठी, माणुसकीसाठी आणि रोजच्या साध्या व्यवहारात दिसणाऱ्या आपुलकीसाठी ओळखले जात होते.
बारामतीतील विमान अपघाताने एका बाजूला राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का दिला, तर दुसऱ्या बाजूला विदीप जाधव यांच्यासारख्या शांत, कर्तव्यदक्ष आणि कुटुंबवत्सल व्यक्तीचा अचानक झालेला अंत अनेकांसाठी असह्य ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मी त्यांना सकाळी 6.30 वाजता कामावर जाताना पाहिलं होतं…'; अजितदादांचे PSO विदीप जाधव यांच्या मृत्यूने कळवा परिसर सुन्न
Next Article
advertisement
'मी त्यांना सकाळी 6.30 वाजता कामावर जाताना पाहिलं होतं…'; अजितदादांचे PSO विदीप जाधव यांच्या मृत्यूने कळवा परिसर सुन्न
मी त्यांना सकाळी कामावर जाताना पाहिलं…; विदीप जाधव यांच्या मृत्यूने शेजारी सुन्न
  • अजित पवारांसोबत सावलीसारखे राहणारे विदीप जाधव

  • नेहमीप्रमाणे दादा कामावर गेले, पण परतलेच नाही

  • विदीप जाधव यांच्या निधनाने कुटुंब पोरकं

View All
advertisement