advertisement

अजितदादांच्या अखेरच्या सलामीला मिसफायर झालं, पोलिसांनी दिली कबुली; कारण आलं समोर

Last Updated:

एका कर्मचाऱ्याकडून मिसफायर झाल्याचा व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी समोर येत मिसफायर झाल्याची कबुली दिली आहे.

News18
News18
पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात निधन झालं. बारामती एअरपोर्टजवळ अजितदादांच विमान लँडिंग करत असताना कोसळलं. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.अजित पवारांच्या अपघाती निधनानं सर्वांनाच धक्का बसला. राजकारणातील उमदं व्यक्तीमत्व असलेल्या अजित पवारांची अकाली एक्झिट महाराष्ट्राला सुन्न करणार ठरली. अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना अंत्यसंस्काराच्यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली त्यावेळी एका कर्मचाऱ्याकडून मिसफायर झाल्याचा व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी समोर येत मिसफायर झाल्याची कबुली दिली आहे.
अजितदादांना पोलिसांकडून अखेरची सलामी देण्यात येत असताना ही घटना घडली. पोलिसांकडून सलामी देताना तीन राऊंड हवेत फायर केले जातात. यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना पोलिसाच्या बंदुकीतून मिसफायर झालं. सुदैवाने बंदुकीतून सुटलेली ही गोळी कोणाला लागली नाही. पोलिसांनी देखील कबुली देत मिसफायरवर स्पष्टीकरण दिली आहे.
advertisement

मिसफायरवर पोलीस काय म्हणाले?

मिसफायरवर स्पष्टीकरण देत पोलिस म्हणाले, अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायरिंग झालं होतं.या बुलेट्समध्ये बंदुकीच्या गोळीप्रमाणे इजा होण्याची क्षमता नसते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी असतात सलामीसाठी तीन राउंड फायर केले जातात तेव्हा या गोळ्या वापरल्या जातात.

अमित शाह अन् मुख्यमंत्र्यांपासून हाकेच्या अंतरावर घटना

advertisement
हा प्रकार घडला तेव्हा समोरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि राज्य मंत्रिमंडळातील दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार हे पार्थिवाला मुखाग्नी देत असतानाच हा प्रकार घडला. सुदैवाने, बंदुकीतून सुटलेली गोळी कोणालाही लागली नाही. मात्र, अशा अत्यंत संवेदनशील प्रसंगी झालेल्या या चुकीमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होत, त्यानंतर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिले.
advertisement

बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतला

बारामतीतून राजकारणाला सुरूवात केली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतला. लोकनेता सोडून गेल्यामुळे पोरकं झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या घटनेला 24 तास उलटले तरी दादा आपल्यात नाही हे पचवणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. अबाल-वृद्ध यांच्या सर्वांच्या भावना सारख्याच होत्या. आपण पोरके झालोत, ही उचंबळून आलेली भावना अश्रू आणि हुंदक्यांच्या रूपानं बाहेर पडत होती
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या अखेरच्या सलामीला मिसफायर झालं, पोलिसांनी दिली कबुली; कारण आलं समोर
Next Article
advertisement
Gold Silver ETF Crash: काही तासांत करोडोंचा चुराडा, सोनं-चांदी ईटीएफमध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
काही तासांत करोडोंचा चुराडा, Gold-Silver ETF मध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
  • Gold Silver ETF गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार हा दिवस धक्कादायक ठरला

  • गोल्ड-सिलव्हर ईटीएफमध्ये १४ टक्क्यांची घसरण दिसून आली.

  • अचानक झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

View All
advertisement