advertisement

वडील लग्नासाठी 'वर' शोधत होते, लेकीच्या सुखी संसाराची स्वप्न विरली, शांभवीचा 'तो' संदेश अखेरचा ठरला

Last Updated:

Shambhavi Pathak : शांभवीने त्या दिवशी मला सकाळी ‘गुड मॉर्निंग’चा संदेश पाठवला होता. ती कधीच मला असे संदेश पाठवत नसे. म्हणून तो संदेश वाचतानाच मनात काहीतरी वेगळे वाटले होते. असं आजी मीरा पाठक यांनी सांगितले.

shambhavi pathak
shambhavi pathak
मुंबई : शांभवीने त्या दिवशी मला सकाळी ‘गुड मॉर्निंग’चा संदेश पाठवला होता. ती कधीच मला असे संदेश पाठवत नसे. म्हणून तो संदेश वाचतानाच मनात काहीतरी वेगळे वाटले होते. तोच संदेश तिच्याकडून आलेला पहिला आणि शेवटचा ठरला,” अशा शब्दांत विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहवैमानिक शांभवी पाठक यांच्या आजी मीरा पाठक यांनी आपल्या नातीच्या आठवणींना उजाळा दिला.
मोठा धक्का बसला..
मीरा पाठक यांनी सांगितले की, अपघाताची धक्कादायक बातमी त्यांना त्यांच्या धाकट्या मुलाकडून दूरध्वनीवरून समजली. “अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानात सहवैमानिक म्हणून शांभवी होती, हे कळताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. उड्डाणाच्या आधी तिने मला सकाळी मोबाइलवर शुभ सकाळचा संदेश पाठवला होता. ती नेहमीच आपल्या कामात गुंतलेली असायची आणि क्वचितच संदेश पाठवायची. पण त्या दिवशी आलेला तिचा संदेश आयुष्यभर न विसरण्यासारखा ठरला,” असे त्या भावूक होत सांगतात.
advertisement
शांभवी पाठक हिने ग्वाल्हेर येथे पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. लहानपणापासूनच तिला आकाशात झेप घेण्याचे स्वप्न होते. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये जाऊन तिने व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला. कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर तिने सहवैमानिक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. दिल्ली, लंडन आणि रशिया येथे तिने विविध उड्डाणांमध्ये सहभाग घेतला होता. “विमान चालवणे हेच तिचे जग होते,” असे तिच्या आजीने सांगितले.
advertisement
सुखी संसाराची स्वप्ने अपघातात उद्ध्वस्त
अवघ्या २५ व्या वर्षी वैमानिक म्हणून स्थिरावलेल्या शांभवीच्या भविष्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मोठी स्वप्ने पाहिली होती. आता मुलीचे लग्न लावून द्यावे, तिचा सुखी संसार उभा राहावा, यासाठी वर शोधण्याचे कामही सुरू झाले होते. शांभवीची आई हवाई दलाच्या बाल भारती शाळेत शिक्षिका असून वडील हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. तिचा भाऊ सध्या नौदलात कार्यरत आहे.
advertisement
बुधवारी दक्षिण दिल्लीतील त्यांच्या घराच्या परिसरात शोककळा पसरली होती. हसतमुख, कर्तव्यनिष्ठ आणि महत्त्वाकांक्षी शांभवीच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघाताची बातमी समजताच आई-वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले.
“ती आमच्यासाठी केवळ नात नव्हती, तर घराचा आधारस्तंभ होती. तिच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील,” असे सांगताना मीरा पाठक यांचे डोळे पाणावले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वडील लग्नासाठी 'वर' शोधत होते, लेकीच्या सुखी संसाराची स्वप्न विरली, शांभवीचा 'तो' संदेश अखेरचा ठरला
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement