'लव्ह मॅरेज आहे का?' भरसभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला प्रश्न, म्हणाले 'शंकेला जागा उरते'
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मंचर इथं प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी महायुतीच्या महिला उमेदवाराला भर सभेत 'लव्ह मॅरेज केलंय का?' असा सवाल केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सचिन तोडकर, प्रतिनिधी मंचर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अनेक ठिकाणी जाऊन ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आपल्या उमेदवाराला निवडून देण्याची मागणी करत आहेत. अजित पवारांनी आज पुणे दौरा केला. पुण्याच्या मंचर इथं प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी महायुतीच्या महिला उमेदवाराला भर सभेत 'लव्ह मॅरेज केलंय का?' असा सवाल केला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सभास्थळी एकच हशा पिकला. अजित पवारांच्या या भाषणाची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मंचर नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार यांची मंचर येथे सभा घेतली. या सभेत बोलत असताना अजित पवार यांनी मंचरमधील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले-बेंडे यांची ओळख करून देताना त्यांचे माहेरही मंचर असल्याचे आणि सासरही मंचरच असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी मोनिका बाणखेले यांच्याकडून पाहून तुमचं लव्ह मॅरेज आहे का? असा मिश्किल प्रश्न विचारला. यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.
advertisement
अजित पवार नक्की काय म्हणाले?
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांची ओळख करून देताना अजित पवार म्हणाले, "आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई सुनील बाणखेले आहेत. त्या पूर्वीच्या बेंडे आहेत. हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. कारण त्या पूर्वीच्या बेंडे आहेत. मोनिकाताईंचं माहेरही इथंच आहे आणि सासरही इथेच आहे."
advertisement
यानंतर अजित पवारांनी मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या मोनिका बाणखेले यांना 'मग लव्ह मॅरेज आहे का?' असा मिश्किल सवाल विचारला. यानंतर त्यांनी "सासर आणि माहेर एकच असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही", असं म्हणत पुन्हा भाषणाच्या मुद्द्यावर आले. अजित पवारांच्या भाषणातील ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 28, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'लव्ह मॅरेज आहे का?' भरसभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला प्रश्न, म्हणाले 'शंकेला जागा उरते'


