तोंडातील लाळेने बरे होतात आजार, ठाण्याच्या डॉक्टरांनी सांगितला वापर करायचा कसा

Last Updated:

Saliva cure disease : लाळेने आजार बरे होतात की वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. किंबहुना अनेकांना तर हे घाण वाटलं असेल. पण ठाण्याच्या डॉक्टरांनी लाळेचे फायदे आणि ती कशी वापराची ते सांगितलं आहे.

News18
News18
आपलं बोट भाजलं, बोटाला काही दुखापत झाली की आपण लगेच ते बोट तोंडात टाकतो. तिथं आपल्या तोंडाची लाळ लागते आणि आपल्याला तात्पुरतं बरं वाटलं. तोंडात लाळ आली की आपण ती थुंकी म्हणून थुंकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का? ही लाळ तुमच्या खूप फायद्याची आहे. लाळेने खूप आजार बरे होतात, असं ठाण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
लाळेने आजार बरे होतात की वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. किंबहुना अनेकांना तर हे घाण वाटलं असेल. पण ठाण्याच्या डॉक्टरांनी लाळेचे फायदे आणि ती कशी वापराची ते सांगितलं आहे. डॉ. मानसी मेहंदळे धामणकर असं या डॉक्टरचं नाव आहे. त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाळेचं महत्त्व सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
डॉ. मानसी म्हणाल्या,  तुम्ही पाहिलं असेल की पशूपक्षी त्यांचं शरीर चाटताना दिसतात. ते आपल्या शरीराला तोंडातील लाळ लावत असतात. कारण त्यांना जखमा वगैरे झाल्या की तसं त्यांच्यावर उपचार करायला कुणी नसतं, त्यामुळे लाळेने ते त्यांच्या जखमा बऱ्या करतात. लाळेमध्ये असं औषध आहे की त्यांच्या जखमा भरून निघतात.
advertisement
लाळेचा उपयोग जखम भरून निघण्यासाठी, डोळ्यांची जळजळ असेल तर ती कमी करण्यासाठी, डोळ्यांखाली डार्क सर्कल असेल तर ते घालवण्यासाठी करू शकता. सकाळी उठल्यावर शिळी लाळ असते ती पाण्यासोबत गिळली तर अॅसिडीटी, आयबीएससारखेपोटाचे विकार कमी होतात. पण रात्री झोपतना ब्रश करायला हवं तर तुम्ही सकाळची लाळ पाण्यासोबत गिळू शकता.  इतकी महत्त्वाची लाळ थुंकू नका, ती गिळा कारण त्यात कॅल्शिअम असतं, अस डॉ. मानसी यांनी सांगितलं.
advertisement
लाळ कशी तयार होते?
लाळ तयार होण्याची प्रक्रिया आपल्या लाळग्रंथी नियंत्रित करतात. लाळ तयार करणाऱ्या 3 मुख्य ग्रंथी असतात, कानाजवळ पॅरॉटिड ग्रंथी, हनुवटीखाली सबमॅन्डिब्युलर ग्रंथी, जिभेखाली सब्लिंग्वल ग्रंथी याशिवाय तोंडात अनेक सूक्ष्म ग्रंथीही असतात ज्या सतत थोडीथोडी लाळ सोडत असतात.
advertisement
लाळग्रंथींच्या आत बारीक पेशी असतात ज्या पाण्यात मिसळलेले खनिज, प्रोटीन, एन्झाईम्स आणि म्युकस तयार करतात. मेंदूचा ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम या ग्रंथींना संकेत देतं. जेव्हा आपण अन्न पाहतो, वास घेतो किंवा चव चाखतो, तेव्हा मेंदू लाळ तयार करा असा सिग्नल पाठवतो. ग्रंथी लगेच सक्रिय होऊन लाळ तोंडात सोडतात. ही लाळ अल्फा-अमायले सारख्या एन्झाईम्सनी भरलेली असते, जी अन्नातील स्टार्चचं विघटन सुरू करते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तोंडातील लाळेने बरे होतात आजार, ठाण्याच्या डॉक्टरांनी सांगितला वापर करायचा कसा
Next Article
advertisement
Sanjay Raut: 'तो पुन्हा येणार...', महिनाभरातच ठाकरे गटाची तोफ मैदानात! संजय राऊतांबाबत समोर आली मोठी अपडेट
'तो पुन्हा येणार...', महिनाभरातच ठाकरेंची तोफ मैदानात! राऊतांबाबत मोठी अपडेट
  • 'तो पुन्हा येणार...', महिनाभरातच ठाकरेंची तोफ मैदानात! राऊतांबाबत मोठी अपडेट

  • 'तो पुन्हा येणार...', महिनाभरातच ठाकरेंची तोफ मैदानात! राऊतांबाबत मोठी अपडेट

  • 'तो पुन्हा येणार...', महिनाभरातच ठाकरेंची तोफ मैदानात! राऊतांबाबत मोठी अपडेट

View All
advertisement