मेरी फ्रेंड से बात क्यूं की? विद्यार्थ्याला गाठलं, पिस्तूल काढली अन्...; छ. संभाजीनगर हादरलं!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीसोबत बोलल्यामुळे तिघांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : एका विद्यार्थ्याला त्याच्या मैत्रिणीशी बोलल्यामुळे तिघांनी पिस्तूल रोखत रॉडने मारहाण केली. ही घटना बुधवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सलीम अली सरोवरामागे घडली. विद्यार्थ्याने याबाबत पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणात एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
'तूने मेरी फ्रेंड से बात क्यूं की,' असे म्हणत फॉर्च्यूनरमधून आलेल्या तिघांनी एका विद्यार्थ्याला पिस्तूल रोखून रॉडने मारले. ही घटना बुधवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सलीम अली सरोवरामागे घडली. या प्रकरणात एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
advertisement
बुधवारी सलीम अली सरोवरच्या पाठीमागे एका कन्स्ट्रक्शन साइटवर समीर (नाव काल्पनिक आहे) मित्रांसोबत बोलत उभा होता. तेथे फॉर्च्यूनरमधून (एमएच 12 यूसी 7545) आरोपी आले. त्याच्यातील एकाने 'तूने मेरी फ्रेंड से बात क्यूं की,' असा जाब विचारला आणि मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्याने पिस्तूल रोखून, 'आज तुझे खतम कर दूंगा,' अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या समीरने तेथून पळ काढला व समीर जवळच असलेल्या एसबीएच कॉलनीत पार्किंगमध्ये लपून बसला. तेथून वडिलांना फोन करून ही घटना सांगितली. समीरचे वडील आणि मित्र त्याला घेण्यासाठी आले. त्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात गेले.
advertisement
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी आणि फिर्यादी (पीडित) दोघेही एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत एकत्र शिकले होते. एका मैत्रिणीवरून त्यांच्यात वाद होता, जो या मारहाणीला कारणीभूत ठरला. मित्राला मारहाण करण्यासाठी मुख्य आरोपीने एका आरोपीला पिस्तूल आणि दुसऱ्या आरोपीला रॉड घेऊन येण्यास सांगितले होते, तर तिसऱ्याला फॉर्च्यूनर घेऊन येण्यास सांगितले होते. या मारहाणीत सहभागी असलेले इतर दोघे आरोपी भाडोत्री असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 12:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मेरी फ्रेंड से बात क्यूं की? विद्यार्थ्याला गाठलं, पिस्तूल काढली अन्...; छ. संभाजीनगर हादरलं!









