अजितदादा सगळ्यांसमोर म्हणाले 'I Love You टू', कार्यकर्त्यांनी केला एकच कल्ला, VIDEO व्हायरल
- Published by:Sachin S
Last Updated:
भाषणं असेल किंवा पत्रकार परिषद असेल, अजितदादा हे नेहमी थेट आणि स्पष्ट बोलून उपस्थितींची मनं जिंकून घेतात. अशातच अजितदादांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे नेहमी सडतोड आणि परखड बोलण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. भाषणं असेल किंवा पत्रकार परिषद असेल, अजितदादा हे नेहमी थेट आणि स्पष्ट बोलून उपस्थितींची मनं जिंकून घेतात. अशातच अजितदादांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजितदादा चक्क 'I Love You टू' असं म्हटले आहे. अजितदादांचं हे उत्तर ऐकून एकच हश्शा पिकला.
advertisement
त्याचं झालं असं की, राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्ध्याचा दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असताना अजितदादा हे पत्रकारांशी संवाद साधत होते. साहजिकच यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादांभोवती गराडा घातला होता.
अजित पवार म्हणाले Love You टू! कार्यकर्त्याच्या प्रेमाला दादाकडून हो! वर्ध्यातला व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/92D93B1TbN
— News18Lokmat (@News18lokmat) August 21, 2025
advertisement
अजितदादा पत्रकारांशी बोलून पुढे निघाले होते, तितक्यात गर्दीतून एका कार्यकर्त्याने 'दादा, आय लव्ह यू' असं म्हणाला. हे ऐकून अजितदादांनी मागे वळून पाहिलं आणि अजितदादा यांनीही 'आय लव्ह यु टू' असं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर एकच हश्शा पिकला. अजितदादांनीही हसू आवरलं नाही, हा संपूर्ण प्रकार सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर घडला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
advertisement
ठाकरे गटाची माजी आमदारांचा अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश
दरम्यान, वर्ध्याच्या हिंगणघाट इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज ठाकरे गटातील नेत्यांचा छोटेखानी पक्षप्रवेश पार पडला. वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी आमदारासह, ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला. हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर कोठारी यांच्या उपस्थित पार पडला. वर्ध्यात शरद पवार गटाकडे एकमेव खासदार असणाऱ्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश केल्याामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Aug 21, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा सगळ्यांसमोर म्हणाले 'I Love You टू', कार्यकर्त्यांनी केला एकच कल्ला, VIDEO व्हायरल









