advertisement

दादांच्या निधनानं राष्ट्रवादीपुढे मोठा प्रश्न, पवार कुटुंबासमोर कोणते पर्याय? 'या' 5 नावांची चर्चा

Last Updated:

अजित पवारांच्या निधनामुळे एनसीपी आणि पवार कुटुंबासमोर अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत.

News18
News18
मुंबई :  अजित पवारांचं अपघाती निधन राज्यासाठी मोठा धक्का ठरला. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावरही मोठा आघात झाला. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढवल्या होत्या. आगामी झेडपी निवडणुका दोन्ही पक्षांनी घड्याळ चिन्हावर लढवण्यावरही एकमत झालं होतं. मात्र आता अजित पवार हयात नसल्यामुळे एनसीपीच्या राजकीय वाटचालीसाठी पक्षाचं नेतृत्व कोण करणार? या साठी पवार कुटुंबासमोर कोणते पर्याय आहेत याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य, पक्षफुटीच्या वेळी अजित पवारांसोबत गेलेले सहकारी आणि दोन्ही गटांना मान्य असलेले शरद पवार एकमेव नेते म्हणून पुढे येऊ शकतात. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पर्याय ठरू शकतात का? अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार थेट पर्याय मानल्या जात आहेत.
अनेक वर्षे बारामतीत महिला गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. मात्र नंतर त्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या. मात्र राज्यातील सर्व भागात त्यांची पकड नाही, सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद नाही ही त्यांची मुख्य उणीव आहे.
advertisement

पार्थ पवारांकडे जबाबदारी देण्याची शक्यता 

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांकडेही अजित पवारांचा वारसदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून पाहिलं जात आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी मावळ मतदारसंघातून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र संघटनात्मक पकड नसल्यानं पार्थ पवारांवर लगेचच जबाबदारी देण्याची शक्यता कमी आहे.

प्रफुल्ल पटेलांकडेही पक्षाचं नेतृत्व देण्याची चर्चा

advertisement
अजित पवारांचे निष्ठावंत नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही पक्षाचं नेतृत्व देण्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांचे दिल्लीतील विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. 2023 मध्ये प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांची साथ दिली होती. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबतचा थेट संवाद, पक्षयंत्रणेचा अनुभव ही त्यांची बलस्थाने आहेत. मात्र महाराष्ट्रात त्यांचा मोठा जनाधार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचा कारभार देण्याचा निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय.
advertisement

सुनील तटकरेंचं नेतृत्व राज्यव्यापी नाही

अजित पवारांची कायम साथ देणाऱ्या सुनील तटकरेंनी कोकणात त्यांचा आणि पक्षाचा राजकीय पाया मजबूत केलाय. जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत. पक्षफुटीनंतर तटकरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यांचं नेतृत्व राज्यव्यापी नाही. यामुळे तटकरेंचं नाव जास्त पुढे रेटलं जावू शकत नाही.
advertisement

धनंजय मुंडेंचा मराठवाड्यात जनाधार

अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले धनंजय मुंडेंचा मराठवाड्यात जनाधार आहे. ओबीसी चेहरा आणि वक्तृत्व शैली ही त्यांची बलस्थानं आहेत. मात्र मुंडेंचे सहकारी वाल्मिक कराड हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. कराड सोबतच्या मैत्रीमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. परिणामी धनंजय मुंडेंना राजीनामाही द्यावा लागला होता. परिणामी यामुळे त्यांचं नाव मागे पडू शकतं.
advertisement

छगन भुजबळांकडे मोठा राजकीय अनुभव

शरद पवार आणि अजित पवारांसोबत असणारे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळांकडे मोठा राजकीय अनुभव आहे. त्यांनी अनेक खाती सांभाळली आहेत. तुरूंगवासानंतर भुजबळांनी राजकारणात पुनरागमन केलं. मात्र वय आणि आधीचे वाद त्यांच्या मार्गातील अडथळे आहेत.

राष्ट्रवादीसमोर शेवटचा आणि सर्वात मोठा पर्याय शरद पवारच

advertisement
राष्ट्रवादीसमोर शेवटचा आणि सर्वात मोठा पर्याय शरद पवारच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांचं शरद पवारांवर एकमत होऊ शकतं. वरिष्ठ नेत्यांशी पवारांचे वैयक्तिक संबंध आहेत. सहकार क्षेत्रावर त्यांचा अजूनही प्रभाव आहे. मात्र वयामुळे शरद पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमांमधील सहभाग कमी केला आहे. सक्रीय सहभागाऐवजी शरद पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरीतच दोन्ही पक्षांचं विलीनीकरण आणि दोन्ही पक्षांना मान्य होईल असं नेतृत्व हेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस समोरील मोठं आव्हान आहे. हे आव्हान कोणता नेता पेलतो, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या निधनानं राष्ट्रवादीपुढे मोठा प्रश्न, पवार कुटुंबासमोर कोणते पर्याय? 'या' 5 नावांची चर्चा
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement