ते चार आमदार कोण? शभूंराज देसाईंच्या दाव्याला आता मिटकरींचाही दुजोरा, म्हणाले...

Last Updated:

शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याला दुजोरा देताना अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

News18
News18
अकोला, 16 ऑक्टोबर कुंदन जाधव : दिवाळीपूर्वी मोठा धमका होणार असल्याचं शिवसेनेचे मंत्री आणि नेते शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांचं आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं बोलंण सुरू आहे. कदाचित त्यामुळे देखील मंत्रिमंडळ विस्तार रखडला असावा असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान आता शंभूराज देसाई यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांना विचारले असता, त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मिटकरी? 
राजकीय पटलावर मोठा भूकंप होण्याची शक्यता शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी म्हटलं की देसाई यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. दिवाळीपूर्वी आमचं संख्याबळ चारने वाढलेलं दिसेल असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. आता मिटकरी यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले देसाई? 
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. आता नवरात्रोत्सवादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
advertisement
कालच पित्रपक्ष संपला, काही लोकांच्या मनात शंका असते त्यामुळे या काळात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र आता नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांची सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. कदाचित त्यापैकी काही जण महायुतीला पाठिंबा देणार असतील, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असेल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
ते चार आमदार कोण? शभूंराज देसाईंच्या दाव्याला आता मिटकरींचाही दुजोरा, म्हणाले...
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement