VIDEO : 'चैत्यभूमीकडे रिक्षा सोडा...' चुनाभट्टीत अखेर आंबेडकरी जिंकले, रास्ता मोकळा, नेमकं काय घडलं?

Last Updated:

आंबेडकरी अनुयायी रिक्षाने जात असताना त्यांना पोलिसांनी अडवल्याची घटना घडली आहे. चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ या अनुयायांना पोलिसांनी अडवल्याची घटना घडली आहे.

mumbai news
mumbai news
Mumbai News : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी शुक्रवारपासूनच दादरच्या चैत्यभूमीच्या दिशेने निघाले आहेत.आज काही उपनगरातील आंबेडकरी अनुयायी रिक्षाने दादरच्या दिशेने येत असताना चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांची रिक्षा अडवल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायी प्रचंड आक्रमक झाले होते आणि त्यांनी रास्ता रोखून धरला होता.त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि मोठा गोंधळही उडाला होता. पण आंबेडकरी अनुयायांच्या या आंदोलनानंतर आता मुंबई पोलिसांनी रिक्षा आणि दुचाकी सोडण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनाला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अनेक आंबडेकरी अनुयायी उपनगरातून रिक्षा घेऊन दादरच्या चैत्यभूमीच्या दिशेने निघाले होते. पण चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ पोलिसांनी काही आंबेडकरी अनुयायांच्या रिक्षा रोखून धरल्या होत्या. खर तर रिक्षाला पुढे जाण्यास परवानगी नव्हती त्यामुळे पोलिसांनी त्या रोखून धरल्या होत्या. तसेच आम्ही दरवर्षी या ठिकाणी रिक्षाने येतो, पण याच वर्षी आम्हाला अडवलं जात असल्याचा आरोप आंबेडकर अनुयायांनी केला होता. तसेच पोलिसांच्या या भूमिकेनंतर आंबेडकर अनुयायांनी आक्रामक पावित्रा घेत चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ झाला होता.
advertisement
दरम्यान आंबेडकरी अनुयायांच्या या आंदोलनानंतर पोलिसांनी रिक्षा आणि दुचाकींना सोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनाला यश आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस रिक्षा अडवू नये.आजच्या दिवसासाठी ⁠सायन पासून रिक्षा येत नाहीत त्याना सूट द्यायला पाहिजे.⁠नियम आहे ते मान्य आहे झेंडा लावून आलेली रिक्षा असेल तिला अडवू नये, ⁠गरीब सर्वसामान्य लोक रिक्षाने अभिवादन करतात,असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : 'चैत्यभूमीकडे रिक्षा सोडा...' चुनाभट्टीत अखेर आंबेडकरी जिंकले, रास्ता मोकळा, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement