Election Result : पवार म्हटले पाडा पाडा पण उलटाचा गेम झाला, पिपाणीने घात केला अन् वळसे पाटील हरता हरता जिंकले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डबल नेमचा डाव टाकून मतदानावेळी उमदेवाराला पेचात टाकण्याचे काम करण्यात आला आहे. डबल नेमचा गेममुळेच देवदत्त निकमांचे गणित बिघडले हे आता स्पष्ट झाले आहे.
पुणे : आंबेगाव मतदार (Ambegaon Vidhan Sabha Election) संघात गुरु-शिष्यामध्ये लढत पाहायला मिळाली. यात मात्र गुरुने मुसंडी मारली आहे. म्हणजेच दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदारकीसाठी उभे होते. त्यांना देवदत्त निकम आव्हान होते. दिलीप वळसे-पाटील यांचा विजय अवघ्या 1500 मतांनी झाला आहे. मात्र वळसे पाटलांचा हा विजय डबल नेमच्या खेळीने झाला आहे.
डबल नेमचा डाव टाकून मतदानावेळी उमदेवाराला पेचात टाकण्याचे काम करण्यात आला आहे. डबल नेमचा गेममुळेच देवदत्त निकमांचे गणित बिघडले हे आता स्पष्ट झाले आहे. दिलीप वळसेंचा एका डावाने देवदत्त निकमांचा विजय हिरावून घेतलाय. वळसेंनी देवदत्त जयवंतराव निकमांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकमांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं.
कसा विजय खेचून आणला?
advertisement
विशेष म्हणजे शरद पवारांच्या देवदत्त निकमांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष देवदत्त निकमांचे चिन्ह हे ट्रम्पेट होते. ट्रॅम्पेट हे चिन्ह लोकसभेवेळी तुतारी नावाने ओळखले जायचे. याचा फायदा वळसेंनी करून घेण्याची खेळी केली, जी वळसेंना तारणारी ठरली. कारण वळसेंचा विजय हा अवघ्या 1500 मतांनी झाला, तेव्हा अपक्ष देवदत्त शिवाजी निकमांना 2900 हुन अधिक मतं मिळाली.
advertisement
देवदत्त निकमांना किती मते मिळाली?
शरद पवारांचे देवदत्त निकम यांच्यासमोर अपक्ष देवदत्त शिवाजी निकम हे साधर्म्य असणारे उमेदवार नसते तर साहजिकच ही 2900 मते शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांना मिळाली असती. त्यामुळं दिलीप वळसेंनी नावात साधर्म असणाऱ्या देवदत्त निकमांना उभं करण्याचा डाव टाकला नसता तर कदाचित वळसेंचा पराभव झाला असता.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2024 1:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Election Result : पवार म्हटले पाडा पाडा पण उलटाचा गेम झाला, पिपाणीने घात केला अन् वळसे पाटील हरता हरता जिंकले


