Amravati: अमरावती पोलीस कॉन्स्टेबल पत्नी हत्या प्रकरणाला नवे वळण, SRPF नवऱ्याने 2 मित्रांनाच दिली होती सुपारी

Last Updated:

तीन दिवसांपूर्वी १ ऑगस्ट रोजी पोलीस कॉन्स्टेबल आशा धुळे यांची राहत्या घरात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 

(अमरावतीमधील घटना)
(अमरावतीमधील घटना)
अमरावती : अमरावती पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल आशा घुले हत्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. या महिला पोलीस कॉन्स्टेबलची हत्या ही तिचाचा पती जो राज्य राखीव पोलीस दलात होता त्यानेच सुपारी देऊन हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी आता हत्या प्रकरणातील दोन सुपारी किलरला अटक करण्यात आली आहे.
अमरावती शहरातील महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा धुळे(तायडे) या पोलीस पत्नीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी अखेरीस दोन सुपारी किलरला अटक केली आहे. श्रेयस महल्ले आणि ओम शिकार असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. आरोपी पती राहुल तायडे यानेच या दोघांना आशा धुळे यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. या दोघांना पत्नीच्या हत्येसाठी पाच लाख रुपये ठरले होते. हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना 25 हजार ॲडव्हान्स देण्यात आले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. सुपारी किलर श्रेयस महल्ले आणि ओम शिकार हे दोघेही राहुल तायडेच मित्र होते.
advertisement
दोघांनी घरात घुसून आशा धुळेंचा दाबला गळा
तीन दिवसांपूर्वी १ ऑगस्ट रोजी आशा धुळे यांची राहत्या घरात गळा दाबून हत्या करण्यात आली होती.  या हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयात असलेला आरोपी पती राहुल तायडे नेच रचला होता. घरात चोरीचा बनाव रचला. त्यानंतर आरोपी श्रेयस महल्ले आणि ओम शिकार हे दोघे १ ऑगस्टला घरात घुसले आणि आशा धुळे यांचा गळा दाबून खून केला.  दोन आरोपी तोंडाला बांधून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
advertisement
प्रेम प्रकरणात अडथळा त्यामुळे काढला बायकोचा काटा
रोपी राहुल तायडेचं 4- 5 वर्षापासून बाहेरील एका महिलेशी प्रेम प्रकरण होतं. त्यातून सतत घरी पत्नी आशासोबत वाद होत होता. आ याआधी देखील पत्नी आशा धुळे यांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. विशेष म्हणजे, राहुल तायडे आणि आशा यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांनाही बारा वर्षांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 13 वर्षांपूर्वी या दोघांचाही प्रेम विवाह झाला होता. पण राहुल बाहेर एका महिलेच्या प्रेमात पडला. बायको सारखी विरोध करत असल्यामुळे त्याने शांत डोक्याने तिचा काटा काढण्याचा कट रचला. शुक्रवारी घरात चोरी झाली यावेळी करून पत्नीची हत्या झाली, असा बनवा राहुलने रचला होता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि २४ तासांमध्ये  राहुल तायडेला अटक केली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: अमरावती पोलीस कॉन्स्टेबल पत्नी हत्या प्रकरणाला नवे वळण, SRPF नवऱ्याने 2 मित्रांनाच दिली होती सुपारी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement