Amravati : अमरावतीमधला कमानीचा वाद चिघळला, जमावाची पोलिसांवर दगडफेक
- Published by:Shreyas
 
Last Updated:
अमरावतीच्या खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीच्या खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. संतप्त जमावाने पोलिसांच्या व्हॅनवरही दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, यासाठी चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. गावातील संचारबंदी झुगारून आंदोलक अमरावतीत दाखल झाले.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आले. यानंतर गावात संचारबंदी लावण्यात आली, पण तरीही आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर आले. याठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेरा घातला.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
March 11, 2024 5:35 PM IST


