कार्तिक एकादशीला व्यंकटेश मंदिरात 10 पट गर्दी, रेलिंग तुटले दर्शनासाठी धावाधाव, चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
काशीबुग्गा येथील वेंकटेश्वरा मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला, मदतकार्य सुरू.
दिवाळीच्या सुट्ट्या अजून संपल्या नाहीत त्यामुळे फिरण्यासाठी, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी लोक बाहेर पडले आहेत. दर्शनासाठी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. व्यंकटेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. भारतातील प्रसिद्ध मंदिरात व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ही गर्दी इतकी वाढली की अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. या दरम्यान रेलिंग तुटले आणि भाविक दर्शनासाठी धावले. या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अनेक जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कार्तिक एकादशी निमित्ताने झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सणाला गालबोट लागलं आहे. 3000 भाविक एकावेळी मंदिरात जाऊ शकतात, इतकीच कपॅसिटी असताना 25000 भाविकांनी गर्दी केली होती.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वरा मंदिरात आज, शनिवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
advertisement
या दुःखद घटनेत भाविकांचा झालेला मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या तीव्र खेद व्यक्त करतो. तसेच, जखमी झालेल्या लोकांना त्वरित आणि योग्य उपचार पुरवण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्यावर देखरेख ठेवण्याची विनंती केली आहे.” घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
advertisement
सकाळच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याच गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने अनेक भाविक खाली कोसळले, ज्यामुळे गंभीर दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Andhra Pradesh
First Published :
November 01, 2025 1:08 PM IST
मराठी बातम्या/देश/
कार्तिक एकादशीला व्यंकटेश मंदिरात 10 पट गर्दी, रेलिंग तुटले दर्शनासाठी धावाधाव, चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू


