पशूधन विकास अधिकाऱ्यानं केली बँक अधिकारी पत्नीची हत्या; आधी डोक्यात वार अन् नंतर मृतदेह फासावर लटकवला, अमरावती हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अमरावतीमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. पशूधन विकास अधिकाऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
अमरावती, संजय शेंडे, प्रतिनिधी : अमरावतीमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. चेतन सोळंके असं आरोपीचं नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके वय 35 वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे. शहरातील अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या. तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे. त्याने दीप्ती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
आत्महत्येचा बनाव
अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना आहे. आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली, आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. आधी दीप्ती यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृतदेहाला गळफास लावण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आलं आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
May 27, 2024 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
पशूधन विकास अधिकाऱ्यानं केली बँक अधिकारी पत्नीची हत्या; आधी डोक्यात वार अन् नंतर मृतदेह फासावर लटकवला, अमरावती हादरलं


