Amravati News: मेहनत ढीगभर अन् मोबदला कवडीभर, स्थलांतरित झाडू विक्रेत्यांनी मांडली व्यथा
- Published by:Vrushali Kedar
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Amravati News: दोन वेळच्या जेवणाची सोय लागावी म्हणून हे व्यवसायिक काम करतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती नाही. त्यामुळे घरातील अबाल वृद्ध झाडू बनवण्याचं काम करतात.
अमरावती: दररोज दोन वेळ पोटभर जेवण मिळावं, यासाठी मानवाला अफाट कष्ट करावे लागतात. अनेकदा आपलं गाव, आपलं घर आणि आपली माणसं सोडून रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागते. व्यवसायिक देखील आपला व्यवसाय वाढवण्यासाठी परप्रांतात स्थलांतरित होतात. मात्र, तिथेही अपेक्षित यश मिळेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. लोकल 18ने अशाच काही स्थलांतरित व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून एक परप्रांतीय कुटुंब वास्तव्याला आहे. हे कुटुंब मूळचे छत्तीसगडमधील बिलासपूर येथील आहे. हे कुटुंब अमरावतीमध्ये फड्यांच्या म्हणजेच केरसुणी आणि पारंपरिक झाडू विक्रीचा व्यवसाय करत आहे. एका व्यवसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबातील 25 लोकं याठिकाणी व्यवसाय करण्यासाठी स्थलांतरीत झाली आहेत. अमरावती परिसरात अनेक मोठमोठे बाजार भरतात. याठिकाणी ते झाडू विक्री करतात.
advertisement
कच्चा माल गोळा करण्यासाठी जीवाची जोखीम
झाडू व्यवसायिक सांगतात की, झाडू बनवणे, हा त्यांच्या वंशपरंपरागत व्यवसाय आहे. घरातील लहान आणि ज्येष्ठ व्यक्ती देखील झाडू बनवण्याच्या कामात मदत करतात. बोरगाव, पंढरी आणि आजूबाजूच्या जंगलातून कच्चा माल गोळा केला जाते. जंगल घनदाट असल्याने जंगली प्राण्यांच्या हल्ल्याची भीती असते. पण, जीवाची पर्वा न करता कच्चा माल जमा करावाच लागतो. कारण, कच्चा माल नसेल तर व्यवसाय चालणार नाही.
advertisement
चिमुकले हातही करतात मदत
दोन वेळच्या जेवणाची सोय लागावी म्हणून हे व्यवसायिक काम करतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती नाही. त्यामुळे घरातील अबाल वृद्ध झाडू बनवण्याचं काम करतात. परिस्थिती अभावी मुलांना शिक्षण देता येत नाही. पाच वर्षांच्यावरील सर्वच मुल व्यवसायात हातभार लावतात, अशी माहिती व्यवसायिकांनी दिली
मेहनत ढीगभर आणि मोबदला कवडीभर
view commentsकच्चा माल जवळ उपलब्ध नसल्याने वाहतूक खर्च वाढतो. कच्चा माल वाहून आणण्यासाठी 4 ते 8 हजार रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागते. त्यानंतर तो माल सुकण्यासाठी ठेवावा लागतो. त्यानंतर त्यापासून झाडू आणि केरसुण्या तयार केले जातात. केरसुण्या तयार करताना अनेकदा हातांना इजा होते. दोन केरसुण्यांची जोडी 40 रुपये तर पाच केरसुण्या 100 रुपयांना, अशा किमतीत मालाची विक्री करावी लागते. अनेकांच्या घरी आता स्टाइल (फरशी) असल्याने पारंपरिक केरसुण्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे मेहनत कमी आणि मोबदला कवडीभर अशी आमची अवस्था झाली आहे, अशी खंत व्यवसायिकांनी व्यक्त केली.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
August 03, 2025 2:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati News: मेहनत ढीगभर अन् मोबदला कवडीभर, स्थलांतरित झाडू विक्रेत्यांनी मांडली व्यथा

