अमरावतीमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कमाल, पल्सरच्या इंजिनपासून बनवली रेसिंग कार्ट, जिंकली 11 बक्षिसं Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी 150 सीसी पल्सर इंजिनपासून रेसिंग कार्ट आणि 6 Kw डीसी मोटर वापरून इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट अशा दोन कार्ट्सची निर्मिती केली आहे.
अमरावती : प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बडनेरा येथील यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे विद्यार्थी गेल्या 5 वर्षांपासून विविध गो कार्ट स्पर्धेत सहभागी होतात. त्यासाठी दरवर्षी ते स्वतः कार्ट तयार करत असतात. यावर्षीसुद्धा त्यांनी स्वयंचलित 150 सीसी पल्सर इंजिनपासून रेसिंग कार्ट आणि 6 Kw डीसी मोटर वापरून इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट अशा दोन कार्ट्सची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी पुणे येथील रफ्तार रेसिंग ट्रॅक येथे झालेल्या गो-कार्ट स्पर्धेत अकरा बक्षिसे पटकावली.
यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अनुप शिरभाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी स्वयंचलित 150 सीसी पल्सर इंजिनपासून रेसिंग कार्ट आणि 6 Kw डीसी मोटर वापरून इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट अशा दोन कार्ट्सची निर्मिती केली होती. प्राध्यापक अभिजीत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन महिन्यांच्या अथक परिश्रमातून ही कार्ट्स साकारण्यात आली. पुणे येथील रफ्तार रेसिंग ट्रॅक येथे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे 40 चमूंनी सहभाग घेतला होता.
advertisement
Success Story : फक्त 14 गुंठ्यात केली लागवड, 45 दिवसात मिळणार लाखात उत्पन्न, शेतकऱ्यानं करून दाखवलं!
PRMIT च्या संघाने दोन्ही प्रकारांत (IC आणि EV) उल्लेखनीय कामगिरी करत 11 बक्षिसे मिळविली आहेत.
इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेली बक्षिसे
1. एकूण सत्र विजेते (चॅम्पियन्स) पुरस्कार प्रथम (AIR 1)
2. सर्वोत्कृष्ट (एन्ड्युरन्स) पुरस्कार- प्रथम
advertisement
3. सर्वोत्कृष्ट ऑटोकॉस पुरस्कार-प्रथम
4. स्किडपॅड स्पर्धा-उपविजेता
5. (टाइम ट्रायल) स्पर्धा-द्वितीय इंटर्नल कम्बशन
(IC) श्रेणीमध्ये मिळवलेली बक्षिसे
1. एकूण सत्र उपविजेते (रनर-अप) पुरस्कार-द्वितीय (AIR 2)
2. सर्वोत्कृष्ट स्किडपॅड पुरस्कार -प्रथम
3. ऑटोकॉस स्पर्धा प्रथम -उपविजेता
4. सर्वोत्कृष्ट (टाइम ट्रायल्स) पुरस्कार-प्रथम
5. (एन्ड्युरन्स) स्पर्धा-उपविजेता
या यशाबद्दल टीमचे मार्गदर्शक प्रा. अभिजीत ठाकरे यांना त्यांच्या अपवादात्मक मार्गदर्शनासाठी 'सर्वोत्कृष्ट विद्याशाखा द्रोणाचार्य पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या यशस्वी टीममध्ये रहीश झाडे, मंथन बुंदे, परिमल साबळे, रौनक लोटिया, आयुष पाटील, चैतन्य कथे, शौर्य चरपे, जयेश भगत, अथर्व शेंडे, यश घोटकर, सिद्धांत रामटेके, पृथ्वीराज देशमुख, प्रणव कहारे, शंतनू लेंडे एकूण 15 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
advertisement
यासर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन आमच्या कॉलेजमध्येच या दोन्ही कार्ट तयार केल्या. त्यामध्ये पार्ट बनविणे, वेल्डिंग करणे, पार्टची जुळवाजुळव करणे यासर्व बाबी विद्यार्थ्यांनी स्वतः केल्या. त्यांना कॉलेजकडून त्यासाठी फंड देखील पुरविण्यात आला. टीमने बनवलेली ईव्ही कार्ट पूर्णपणे कॉलेज वर्कशॉपमध्ये डिझाइन करण्यात आली. ज्याची सुरुवात ऑटोकॅड आणि सॉलिडवर्क्स वापरून डिजिटल डिझाइन आणि सिम्युलेशनने झाली होती. विद्यार्थ्यांनी चेसिस फॅब्रिकेशन, बॅटरी माउंटिंग असेंब्ली, ब्रेकिंग सिस्टम आणि मोटर इंटिग्रेशनसह संपूर्ण पार्टस स्वतः तयार केले. या दोन्ही कार्ट बसविण्यासाठी विद्यार्थ्यांना 2.15 लाख रुपये खर्च आला. याच विद्यार्थ्यांनी यापूर्वी AIMS, GKDC आणि MMS सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
November 20, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
अमरावतीमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कमाल, पल्सरच्या इंजिनपासून बनवली रेसिंग कार्ट, जिंकली 11 बक्षिसं Video

