City Bird Amravati : तांबट पक्ष्याला मिळाली अमरावतीची ओळख, सिटी बर्ड घोषित करत महापालिकेने रचला इतिहास

Last Updated:

‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ अंतर्गत अमरावतीचा पहिला अधिकृत शहर पक्षी म्हणून ‘तांबट’ निवडण्यात आला आहे. 

Amravati News 
Amravati News 
अमरावती : पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा देत अमरावती महानगरपालिकेने एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ अंतर्गत अमरावतीचा पहिला अधिकृत शहर पक्षी म्हणून ‘तांबट’ निवडण्यात आला आहे. यामुळे अमरावतीने राज्यातील अधिकृत सिटी बर्ड जाहीर करणारी पहिली महापालिका म्हणून हा सन्मान मिळवला आहे. रविवारी, 30 नोव्हेंबर रोजी ‘हॅपी स्ट्रीट’ कार्यक्रमात महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली.
नागरिकांच्या सहभागातून निवड प्रक्रिया
शहरपक्षी निवडीसाठी महानगरपालिका व वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्थेमध्ये एमओयू करण्यात आला होता. नागरिकांचा व्यापक सहभाग मिळावा यासाठी महापालिकेने विशेष ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले. 18 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रक्रिया खुली ठेवण्यात आली. निकाल 30 नोव्हेंबरला जाहीर झाला.
advertisement
या मतदानात एकूण 5445 मते नागरिकांनी दिली. त्यात तांबट पक्षाला सर्वाधिक 1414 मते मिळाली. त्यामुळे तो आता अमरावतीचा सिटी बर्ड म्हणून घोषित केलाय. तसेच मोठा कोतवाल 1032 मते, राखी शहामृग 998 मते, हुडहुडी 796 मते, छोटे घुबड 655 मते, शिकरा 551 मते मिळाली आहेत. तांबट पक्ष्याला मिळालेले जनसमर्थन बघता तो शहराच्या पर्यावरणीय ओळखीचे प्रतीक ठरला आहे.
advertisement
शहरात तांबटची भव्य मूर्ती उभारणार
आयुक्त शर्मा चांडक यांनी सांगितले की, जैवविविधतेचे संरक्षण आणि पक्ष्यांविषयी जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणीय अभिमान वाढावा म्हणून शहराच्या प्रमुख चौकात तांबटची भव्य मूर्ती उभारली जाईल. हा उपक्रम अमरावतीला हरित, पर्यावरणपूरक ओळख देईल.
view comments
मराठी बातम्या/अमरावती/
City Bird Amravati : तांबट पक्ष्याला मिळाली अमरावतीची ओळख, सिटी बर्ड घोषित करत महापालिकेने रचला इतिहास
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement