'बटेंगे तो कटेंगे'ला भाजपमधील माजी मुख्यमंत्र्याचा विरोध, ''अशा घोषणा म्हणजे....''
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना 'बटेंगे तो कटेंगे'चा अर्थ समजावून सांगितला होता. त्यानंतर देखील आता महायुतीतून या घोषणेला विरोध होतोय.
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या प्रचारसभेत येऊन 'बटेंगे तो कटेंगे'ची घोषणा केली होती. भाजपच्या या घोषणेला महायुतीतूनच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना 'बटेंगे तो कटेंगे'चा अर्थ समजावून सांगितला होता. त्यानंतर देखील आता महायुतीतून या घोषणेला विरोध होतोय. आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध केला आहे.
कुठल्याही भाजपच्या नेत्याने किंवा प्रवक्त्याने हे विधान केलेले नाही. हा थर्ड पार्टीने पुढे आणलेला हा विषय आहे. मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. हे विधान चुकीचे आहे. पक्षाने याला कुठल्याही प्रकारचे समर्थन दिलेले नाही. आणि ज्यांनी कुणी याला समर्थन दिले आहे. त्यांचे समर्थन मी बिल्कुल करणार नाही, हे माझं वैयक्तित मतं आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
advertisement
अशोक चव्हाण पुढे म्हणाले, लोकं म्हणाले की तुम्ही या पक्षात आलात तुमची विचारधारा काय आहे. तर मी हिंदू आहे, पण सेक्युलर हिंदू आहे. देशाच्या अठरा पगड जातींना सोबत घेऊन चाललो आहे. आणि पुढेही चालेन,असे त्यांनी सांगितले आहे. तसेच माझा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे माझं मत मी स्पष्ट केलेले आहे. लोकांनाही माहिती आहे. माझा फोकस हा सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा आहे.
advertisement
सामाजिक किंवा जातीय रंग कुठल्याही निवडणुकीला येऊ नये.अशा पद्धतीने काम केले पाहिजे. आम्ही संविधानाने काम करणारी लोकं आहोत. आणि केले पाहिजे अशी माझी भुमिका आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बटेंगे तो कटेंगे'ला भाजपमधील माजी मुख्यमंत्र्याचा विरोध, ''अशा घोषणा म्हणजे....''


