Aurangabad Railway Station : महाराष्ट्रातील ऐतिहासिक रेल्वे स्टेशनचं नाव बदललं! औरंगाबाद नाही तर आता...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Railway Station : साउथ सेंट्रल रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या औरंगाबाद स्थानकाचा उल्लेख आता यापुढे 'छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन' म्हणून केला जाईल.

Aurangabad Railway Station rename as Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad Railway Station rename as Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad Railway Station Rename : गेल्या दोन दशकापासून औरंगाबाद शहराच्या नामंतराचा मुद्दा चर्चेत आला होता. औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. अशातच आता औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव देखील बदलण्यात आलं आहे. साऊथ सेंट्रल रेल्वे विभागाने अधिसूचना जारी करत औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ असं नामकरण केलं आहे.

'छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्टेशन

साउथ सेंट्रल रेल्वेने (दक्षिण मध्य रेल्वे) औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्टेशन असं केलं आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे. या नामकरणानंतर आता रेल्वेच्या नोंदी आणि प्रवाशांसाठीच्या माहितीमध्ये हे बदल त्वरित लागू होतील. यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं केलं आहे.
advertisement

साउथ सेंट्रल रेल्वेची घोषणा

महाराष्ट्र सरकारने केलेल्या औरंगाबादचं नामकरणानंतर आता रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात आले आहे. साउथ सेंट्रल रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या या स्थानकाचा उल्लेख आता यापुढे 'छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन' म्हणून केला जाईल.
advertisement
दरम्यान, महायुती सरकारने 15 ऑक्टोबर रोजी औपचारिक अधिसूचना जारी करून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचे आदेश दिले. औरंगाबाद रेल्वे स्थानकाची सुरुवात 1900 मध्ये झाली, जेव्हा हैदराबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांच्या काळात शहर विकसित होत होते. हे स्थानक त्या काळातील रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जात असे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aurangabad Railway Station : महाराष्ट्रातील ऐतिहासिक रेल्वे स्टेशनचं नाव बदललं! औरंगाबाद नाही तर आता...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement