Chhatrapati Sambhajinagar : आई रोज येते… पण पिल्लांना घेऊन जात नाही; 2 निष्पाप जीवांचे भवितव्य धोक्यात
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये बिरोळा–जीरी परिसरातील मानवी स्पर्श झालेल्या बिबट्या पिल्लांना त्यांच्या मादीपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी वनविभागाचे प्राणपणाने प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरे, पावलांचे ठसे आणि रात्रीच्या हालचालींवर आधारित शोधमोहीम सुरू असून परिस्थिती गुंतागुंतीची बनली आहे.
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील बिरोळा–जीरी परिसरात दहा दिवसांपूर्वी ऊसतोडीच्या कामात असलेल्या मजुरांना दोन बिबट्याची पिल्ले दिसून आली. अज्ञानातून या पिल्लांना काहींनी हाताळल्याची माहिती पुढे येताच वनविभागाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या आईपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या पिल्लांना मानवाचा स्पर्श झाल्याने मादी रोज रात्री त्या ठिकाणी येऊनही त्यांना घेऊन निघत नसल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. स्थानिकांमध्येही या घटनेबद्दल उत्सुकता आणि चिंता दोन्ही निर्माण झाली आहे.
पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणिमित्र आणि वनकर्मचारी सातत्याने काम करत आहेत. परिसरात शांतता राखणे, नागरिकांची गर्दी थांबवणे, आवाज कमी ठेवणे अशा उपाययोजना राबवून पिल्लांच्या आसपास सुरक्षित वातावरण निर्माण केले जात आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि पिल्लांपासून दूर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जवळच काही दिवसांपूर्वी रानात पाचट जळून गेल्यानंतर परिसर उघडा झाला आहे. तरीही नाइट-व्हिजन कॅमेऱ्यांत मादी बिबट्या सदैव पिल्लांच्या आसपास फिरताना दिसते. पण मानवी गंधामुळे ती जवळ असूनही पिल्लांना सोबत घेऊन जात नाही. त्यामुळे ही लहान पिल्ले भुकेमुळे आणि इतर वन्य प्राण्यांच्या संभाव्य हल्ल्यामुळे धोक्यात आहेत.
advertisement
ऊसतोडीच्या वेळी कामगारांना मादी बिबट्या आणि तीन पिल्ले दिसल्याने अचानक आरडाओरड झाली. त्यातून मादी दोन पिल्लांना घेऊन दूर गेली, पण एक पिल्लू मागे पडले. उत्सुकतेमुळे अनेकांनी त्याला हात लावला. दरम्यान, जवळच सापडलेल्या दुसऱ्या पिल्लालाही काही ग्रामस्थांनी स्पर्श केल्याचे समजले. त्यामुळे दोन ठिकाणची पिल्ले मानवाच्या संपर्कात आल्याची बाब वनविभागाला कळताच पथकाने तातडीने त्यांचे निरीक्षण सुरू केले.
advertisement
वनविभागाने गेल्या दहा दिवसांपासून विशेष कॅमेरे, पावलांचे ठसे, पिंजरे आणि रात्रीच्या हालचालींच्या आधारे मादीचा शोध घेत तिला पिल्लांच्या जवळ आणण्याचे कसून प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : आई रोज येते… पण पिल्लांना घेऊन जात नाही; 2 निष्पाप जीवांचे भवितव्य धोक्यात


