Chhatrapati Sambhajinagar : सकाळी साधूचे सोंग अन् रात्रीचा सैतान! छ. संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसोबतचा भयानक प्रकार उघड
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकाकडून गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मिनी घाटी परिसरात कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही महिन्यांत अमली पदार्थांची तस्करी चिंताजनक पातळीवर वाढली आहे. विशेषतः गांजा, ब्राऊन शुगरसारख्या पदार्थांची मागणी वाढत असून तरुण, विशेषतः कॉलेजमध्ये शिकणारी तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची बाब समोर येत आहे.
काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही ड्रग्जच्या चक्रात खेचले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. वाढत्या तस्करीमुळे अनेक भागात नागरिकांनी आंदोलन, उपोषणे केली असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याचं पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत मिनी घाटी परिसरात कॉलेज तरुणांना गांजा विकणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली. शुभम मधुकर साठे (24, चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
advertisement
11 नोव्हेंबर रोजी गस्तीवर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक भारत पाचोळे यांच्या पथकाला परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. चौधरी कॉलनी मिनी घाटी भागात पाहणीदरम्यान शुभम पिशवी हातात घेऊन उभा असल्याचे दिसले. पोलिस जवळ आल्याचे लक्षात येताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर तोल जाऊन पडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासणी करताना त्याच्याकडे तब्बल 4 किलो 218 ग्रॅम गांजा सापडला. या कारवाईत अंमलदार संजय नंद, संतोष सोनवणे, परशुराम सोनुने, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, रतन नागलोत व अरविंद पुरी यांनी सहभाग घेतला.
advertisement
शुभम साठे हा अमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे असलेला रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याला यापूर्वी दोन वेळा अटक झाली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याला सेवन करताना पकडले होते, तर चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी दहा किलो गांजासह त्याला पकडले होते. शिवाय त्याच्यावर मारहाणीचा एक गुन्हाही नोंद आहे.
रिक्षा चालवण्याचे आडोसे घेऊन तो रोजच्या प्रवाशांसह विद्यार्थी आणि युवकांशी संपर्क ठेवत होता. रामनगर, विठ्ठलनगर, चिकलठाणा परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी हे त्याचे मुख्य ग्राहक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : सकाळी साधूचे सोंग अन् रात्रीचा सैतान! छ. संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसोबतचा भयानक प्रकार उघड


