Agriculture : शेतकऱ्याचे नुकसान टळणार, पेरणीसाठी सरकारचे कृषीधोरण, विक्रेतेही करतायत जनजागृती, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
एकदा मान्सून दाखल झाला की सर्व शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होते. मात्र अजूनही बियाणं दुकानांमध्ये उपलब्ध नाहीत. सरकारच्या नवीन कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांना 1 जून नंतरच पेरणी करावी लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : लवकरच राज्यामध्ये आता मान्सून दाखल होणार आहे. एकदा मान्सून दाखल झाला की सर्व शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होते. मात्र अजूनही बियाणं दुकानांमध्ये उपलब्ध नाहीत. सरकारच्या नवीन कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांना 1 जून नंतरच पेरणी करावी लागणार आहे. त्यानुसार पुरवठाही दुकानदारांना 20 मे नंतर सुरू करण्यात येणार आहे.
1 जून पूर्वी पेरणी केली तर बियाणे उगवण्यास अडचणी येतात, पिकांवर रोग पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे उत्पन्नात घट होऊ शकते. याचा अभ्यास करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची गाईडलाईन दिली आहे. दुकानदारही बियाणे विकताना शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. त्यामुळे जे पण शेतकरी आहेत त्यांना 1 जून नंतरच पेरणी करावी कारण की त्यांना मुबलक प्रमाणामध्ये चांगल्या प्रतीचे बियाणे हे उपलब्ध होतील.
advertisement
तसेच सर्व शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना जे अधिकृत शासनमान्य दुकान आहेत अशा सर्व दुकानातून बियाणे खरेदी करावेत आणि चांगल्या पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी जेणेकरून तुमचं उत्पन्न हे चांगला येईल आणि तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान यामध्ये होणार नाही, असं देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
advertisement
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एवढी काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी सर्व दुकानदार देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि जेव्हा जागृती देखील करताना दिसत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे देखील सर्व विक्रेते आवाहन करत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 20, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Agriculture : शेतकऱ्याचे नुकसान टळणार, पेरणीसाठी सरकारचे कृषीधोरण, विक्रेतेही करतायत जनजागृती, Video

