'ही माझीच चूक आहे... आय ॲम सॉरी', म्हणत बड्या नेत्याच्या पुतण्याने घेतला गळफास; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा पुतण्या आणि बांधकाम व्यावसायिक राजू तनवाणी यांचा मुलगा दीपेश तनवाणी याने...
छत्रपती संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक राजू तनवाणी यांचा मुलगा आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा पुतण्या दीपेश तनवाणी (वय-26) याने उस्मानपुरा येथील एका फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. "आय ॲम नॉट अंडर प्रेशर. धिस इज माय फॉल्ट ओन्ली, आय ॲम सॉरी..." अशी इंग्रजीत सुसाइड नोट लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दीपेश हा आपल्या आई-वडिलांसोबत मछलीखडक परिसरात राहत होता. तीन महिन्यांपूर्वी तो उस्मानपुरा येथील अमृतसाई एकदंत अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर स्वतंत्र राहायला गेला होता. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी सकाळपर्यंत नातेवाईकांनी त्याला फोन करूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी काळजीने अपार्टमेंटकडे धाव घेतली. एका व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावरून गॅलरीत प्रवेश केला आणि बेडरूमचा दरवाजा तोडून आत पाहिले असता, दीपेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजित पाटील आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पंचनामा करण्यात आला आणि दीपेशचा मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात पाठवण्यात आला.
आत्महत्येची पद्धत आणि सुसाइड नोट
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, दीपेशने वापरलेली दोरी नवीन होती. तसेच, गळफास घेताना त्याने दोन्ही पाय दोरीने बांधले होते आणि दोन्ही हातांची मनगटेही दोरीत अडकवली होती. टेबलवर उभे राहून त्याने गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याने सोमवारीच आत्महत्या केली असावी, असे मानले जाते.
advertisement
आत्महत्येपूर्वी त्याने शेंद्र्या येथील साईटच्या हिशोबाच्या रजिस्टरमध्ये इंग्रजीत एक सुसाइड नोट लिहिली होती. त्यात त्याने लिहिले आहे की, 'मी कोणाच्याही दबावाखाली नाही. ही केवळ माझीच चूक आहे. प्रियजनांना त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. मी कोणाच्याही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मी सगळ्यांना आनंदी ठेवू शकलो नाही. आय लव्ह यू.' या संपूर्ण नोटमध्ये त्याने चार वेळा 'आय ॲम सॉरी' असे लिहिले आहे.
advertisement
शिक्षण आणि व्यवसाय
एका नामांकित शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीपेशने परदेशातून एमबीएची पदवी घेतली होती. कोरोनाच्या काळात शहरात परतल्यानंतर तो कौटुंबिक बांधकाम व्यवसायात सक्रिय झाला होता. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनासाठी तो घरी गेला होता आणि त्यानंतर सोमवारी सकाळपासून त्याचे फोनला प्रतिसाद देणे बंद झाले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्याच्या फोनची बॅटरी संपून तो स्विच ऑफ झाला होता.
advertisement
पोलिसांनी घातपाताचा संशय फेटाळला
दीपेशने पाय बांधलेल्या अवस्थेत आत्महत्या केल्यामुळे सुरुवातीला घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपास केला असता, बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. तसेच, मुख्य दरवाजाला डिजिटल लॉक होते, जे केवळ दीपेशच्याच बोटाच्या ठशांनी उघडत होते. घरात दुसऱ्या कोणाच्याही येण्या-जाण्याचे पुरावे न आढळल्यामुळे ही आत्महत्याच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
advertisement
हे ही वाचा : 'तो' मागून आला, हिसकावलं मंगळसूत्र, पळून जाणार इतक्यात असं काही घडलं की... साताऱ्यात घडला थरार!
हे ही वाचा : पोटच्या पोरीनं केला कांड; आईचं चोरलं 'इतकं' तोळं सोनं अन् दिलं मित्राला, आता 'तो' म्हणतोय की...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
'ही माझीच चूक आहे... आय ॲम सॉरी', म्हणत बड्या नेत्याच्या पुतण्याने घेतला गळफास; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा


