मी होतो म्हणून बीडमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष होता, आता... भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचे विधान
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Badamrao Pandit Join BJP: बदामराव पंडित यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेश केला.
बीड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मी होतो. त्यामुळेच बीड जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष होता. परंतु आता मी भाजपात प्रवेश केल्याने बीड जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राहिला नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले गेवराईचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी केले.
बदामराव पंडित यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचाली विषयी भूमिका स्पष्ट करत आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत दिले.
गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. आता शेवट पुन्हा भाजपात मी प्रवेश केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मी प्रवेशासाठी विनंती केली होती अखेर याला मुहूर्त मिळाला असून परळी येथे मी भाजपात प्रवेश केला. आता मुंबई येथे प्रवेश सोहळा देखील होणार असल्याची माहिती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दिली.
advertisement
कोण आहेत बदामराव पंडित?
बदामराव पंडीत हे बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत. गेवराईत बदामराव पंडित यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद नक्कीच वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरणार शकतो. गेवराईच्या राजकारणात बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्यात कायमच राजकीय संघर्ष राहिला आहे.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
November 02, 2025 3:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी होतो म्हणून बीडमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष होता, आता... भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचे विधान


