नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक, माजी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला; दिला इशारा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संतप्त आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.
नांदेड : मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करून या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी जत तालुक्यासह परिसरातील बंजारा समाजाने विविध जिल्ह्यात मोर्चे काढले आहेत. दरम्यान आज संतापलेल्या बंजारा समाजाने आज माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचा ताफा अडवला. ताफा अडवून त्यासमोर बंजारा समाज बांधवांनी घोषणाबाजी केली
खासदार चव्हाण यांचा ताफा सारखणी गावातून जात असताना अचानक आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखला. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी खासदारांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर किनवट परिसरातही बंजारा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
advertisement
आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा, आंदोलक आक्रमक
या वेळी खासदार अशोक चव्हाण यांनी ताफा अडवल्यानंतर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्या मागण्या सांगायच्या असतील तर ते शांततेने सांगा. पण हे जर करायचं असेल तर मला थांबवलं कशाला? असा सवाल त्यांनी आंदोलकांना केला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.
advertisement
काही काळ तणावाचे वातावरण निर्माण
या घटनेमुळे सारखणी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती नंतर सुरळीत करण्यात आली. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात पुन्हा एकदा असंतोष वाढत असून, येत्या काही दिवसांत या आंदोलनाला आणखी उग्र वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
October 11, 2025 6:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक, माजी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला; दिला इशारा