Baramati: हॉटेल बाहेर गाडी पार्किंगच्या कारणावरून राडा, तरुणावर लाठ्या काठ्यांनी हल्ला

Last Updated:

बारामती शहरात गाडी पार्किंगच्या कारणावरून झालेल्या राड्यावेळी लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आला.

बारामती पोलीस
बारामती पोलीस
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : बारामती शहरातील भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेल बाहेर पार्किंगच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून काठ्या आणि दगडांनी हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी तात्काळ धाव घेत कारवाई करत एकाला अटक केली आहे.

मित्रांना बाहेरून बोलावलं, तरुणावर जबर हल्ला

२९ नोव्हेंबर रोजी सकाळी मानस पाटील (रा. तानाई नगर, बारामती) हे त्यांच्या मित्रांसह उदय, कुश, साहिल, मनिष, चैतन्य, ओंकार आणि स्वयम हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. यावेळी पार्किंगवरून अनोळखी मुलांशी वाद झाला. त्यानंतर आरोपीदेखील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बसले. दरम्यान त्यांनी फोन करून ८-१० जणांना बाहेरून बोलावले.
advertisement

दगड फेकून गाडीच्या काचा फोडल्या, लोखंडी गजाने हल्ल्याचा प्रयत्न

फिर्यादी पाटील जेवण करून बाहेर येताच आरोपींनी अचानक काठ्या, लोखंडी गज आणि दगडांनी हल्ला चढवला. दगड फेकून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. मानस पाटील आणि त्यांच्यासोबतच्या मित्रांना मारहाण करण्यात आली. फिर्यादीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड आणि गजाने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati: हॉटेल बाहेर गाडी पार्किंगच्या कारणावरून राडा, तरुणावर लाठ्या काठ्यांनी हल्ला
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement