बीडच्या केजमध्ये तुफान राडा, बसेसवर दगडफेक, प्रवाशांना दगड लागले, अनेक जण जखमी

Last Updated:

Beed Kaij Rasta Roko Protest: बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात येत होते.

केजमध्ये आंदोलक आक्रमक
केजमध्ये आंदोलक आक्रमक
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातील केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. महामंडळाच्या अनेक बस गाड्यांची तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. काही प्रवाशांना देखील दगड लागल्याने ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात येत होते. अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन तासाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू असल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलन थांबवण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलिसांनी मध्यस्थी करूनही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. मागणी मान्य होत नसल्याने काही तरूण आक्रमक झाले होते. त्यांनी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. दगडफेकीत काही एसटी गाड्यांचे नुकसान झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची पांगापाग झाली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडच्या केजमध्ये तुफान राडा, बसेसवर दगडफेक, प्रवाशांना दगड लागले, अनेक जण जखमी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement