बीडच्या नगरपालिकेत आता 'महिलाराज', आरक्षण जाहीर, जाणून घ्या परळीत कुणाला संधी?

Last Updated:

बीड जिल्ह्यातील सहा पैकी चार नगरपालिका या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहे.

beed news
beed news
मुंबई :  राज्यातील 147 नगर पंचायती आणि 247 नगर परिषदांच्या नगराध्यक्षांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये कोणत्या नगर पंचायत किंवी नगर परिषदेत कोणत्या प्रवर्गासाठी जागा सुटली आहे, याची माहिती आता समोर आली आहे. या माहितीनंतर आता प्रत्येक नगर पंचायती आणि नगर परिषदांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या आरक्षणावरच राजकीय समीकरणं अवलंबून असतात. बीड जिल्ह्यातील सहा पैकी चार नगरपालिका या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने हालचालींना गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांवरील आरक्षणाची सोडत आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. न बीड जिल्ह्यातील आरक्षणही या सोडतीत निश्चित करण्यात आले.मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात, मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले असून, यामुळे आगामी निवडणुकीत महिला नेतृत्वाला मोठा संधी मिळणार आहे.
advertisement

सहा नगरपालिकांपैकी चार नगरपालिका या महिलांसाठी

बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी चार नगरपालिका या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर दोन नगरपालिका या अंबाजोगाई आणि धारुरसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. बीड- अनुसूचित जाती महिला, माजलगाव - ओबीसी महिला, अंबाजोगाई - ओबीसी , धारूर- सर्वसाधारण , परळी - सर्वसाधारण महिला , गेवराई- सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
advertisement

बीड जिल्ह्यातील नगरपालिकांचे आरक्षण चित्र

बीड- अनुसूचित जाती महिला
माजलगाव - ओबीसी महिला
अंबाजोगाई - ओबीसी
धारूर- सर्वसाधारण
परळी - सर्वसाधारण महिला
गेवराई- सर्वसाधारण महिला.
147 नगरपंचायत अध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. एकूण महिलांसाठी 74 जागा राखी त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7, मागासवर्ग प्रवरगास 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडच्या नगरपालिकेत आता 'महिलाराज', आरक्षण जाहीर, जाणून घ्या परळीत कुणाला संधी?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement