Beed News : दोन लग्न झालेल्या व्यक्तीचा शेजारच्या मुलीवर जडला जीव, फूस लावून नेलं पळवून
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दोन लग्न झालेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीने शेजारच्याच 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचं प्रकरण समोर आलंय. या घटनेनं एकच खळबळ उडालीय.
सुरेश जाधव, बीड, 28 डिसेंबर : आजकाल प्रेम, अफेअर, ब्रेकअपच्या अनेक विचित्र घटना समोर येत असतात. कधी कोण काय पाऊल उचलेल काही सांगू शकत नाही. अशीच एक घटना बीडमधून समोर आलीय. दोन लग्न झालेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीने शेजारच्याच 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचं प्रकरण समोर आलंय. या घटनेनं एकच खळबळ उडालीय.
दोन लग्न झालेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीने शेजारच्याच 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या परळी तालुक्यात उघडकीस आला आहे. यासंदर्भात सिरसाळा पोलीस ठाण्यात नराधम आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होवूनही मुलगी व आरोपीचा शोध लावला जात नाही असा आरोप पिढीत कुटुंबानं केलाय. या संदर्भात कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे.
advertisement
दरम्यान, नातेवाइकांनी 20 ऑक्टोबर 2023 ला संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीच्या अटकेची मागणी कुटुंबाकडून केली जात आहे. कुटुंबीयांनी माजलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यांना लेखी तक्रार व निवेदन दिलं. त्यांनीही काहीच कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत कुटुंबीयांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय.
advertisement
अशा विचित्र घटना कायमच समोर येत असतात. लग्न होऊनही मुले मुली समोरच्या कुटुंबाला फसवतात. त्यांच्या जाळ्यात ओढून फरार होतात. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा घटना समोर येत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2023 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News : दोन लग्न झालेल्या व्यक्तीचा शेजारच्या मुलीवर जडला जीव, फूस लावून नेलं पळवून









