advertisement

Beed: फटाके फोडताना ७ वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी गमावण्याची भीती

Last Updated:

मी घरकाम करते. नेहमीप्रमाणे मी सकाळी ९ वाजता कामावर गेले. घरातून बाहेर पडल्यावर २० मिनिटांतच मला फोन आला की तुमच्या बाळाला भाजलंय. मी तातडीने घरी आले. त्यावेळी बाळाचे डोळेही उघडत नव्हते, असे मुलाच्या आईने सांगितले.

मुलाचे डोळे भाजले
मुलाचे डोळे भाजले
बीड : बीड शहरातील नागोबा गल्लीतील सात वर्षीय राजेश शिकलकरी नामक मुलाचे फटाके फोडताना डोळे भाजले आहेत. मुलाची आई मोलकरीण म्हणून काम करते. ऐन दिवाळीत मुलाच्या डोळ्यावर आघात झाल्याने त्याच्या आईवर संकट कोसळले आहे.
न फुटलेल्या एका फटाक्याची दारू बाहेर काढून पुन्हा ती पेटवून दिली अन् त्यात त्याचा चेहरा भाजून डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे दृष्टी गमावण्याची वेळ त्या मुलावर आली आहे. त्या मुलाची आई मोलकरीण म्हणून बाहेर कामाला जाते आई बाहेर गेल्यानंतर ही सगळी घटना घडली.

घराच्या बाहेर पडले आणि १५ मिनिटांत फोन आला, बाळाला भाजलंय

advertisement
मी घरकाम करते. नेहमीप्रमाणे मी सकाळी ९ वाजता कामावर गेले. घरातून बाहेर पडल्यावर २० मिनिटांतच मला फोन आला की तुमच्या बाळाला भाजलंय. मी तातडीने घरी आले. त्यावेळी बाळाचे डोळेही उघडत नव्हते. लागलीच बीडमधील एका खासगी रुग्णालयात आम्ही त्याला घेऊन गेलो. त्यांनी प्रथमोपचार केले. परंतु आमची परिस्थिती गरिबीची आहे. खासगी रुग्णालयात आम्ही उपचार घेऊ शकत नाही. बाळाला जालन्याच्या दवाखान्यात न्यावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले परंतु आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन आलो आहे, असे मुलाची आई सुनिताकौर शिकलकरी यांनी सांगितले.
advertisement

प्राथमिक उपचार केले पण मुलावर डोळे गमावण्याची वेळ, डॉक्टरांना भीती

न वाजलेल्या फटाक्यातील दारू काढून तिला आग लावत असताना राजेशच्या डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याला गंभीर इजा झाली आहे. त्याचे तोंडही भाजले आहे. प्रसंगी त्याच्यावर दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. लहान मुलांना फटाके देताना कुटुंबातील सदस्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन डॉ. संजय जानवळे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: फटाके फोडताना ७ वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी गमावण्याची भीती
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement