Beed: SP च्या घरात गांजा ओढत बसला, दार वाजवलं तरी उघडेना; कॉवतसाहेबांची सटकली, थेट सस्पेन्डची ऑर्डर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बीडमध्ये एसपीच्या बंगल्यावर एक पोलिस कर्मचारी ऑन ड्युटी गांजा पिताना पकडण्यात आला आहे
सुरेश जाधव, प्रतिनिधई
बीड : वाढती गुन्हेगारी, दहशत आणि अराजकतेमुळे बीड राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे बीडचा बिहार झाला का असे चित्र निर्माण होत असताना गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे डॅशिंग आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्याकडून बीडमध्ये धडाकेबाज पद्धतीने काम सुरु आहे. त्यांनी बीडमध्ये अवैध उद्योगधंद्यांविरोधात चांगलाच मोर्चा काढला आहे. मात्र त्यांच्याच बंगल्यावर एक पोलिस कर्मचारी ऑन ड्युटी गांजा पिताना पकडण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आगे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थानीच रात्री एका कर्मचाऱ्याला एसपींनीच गांजा पिताना रंगेहात पकडले. बाळू बहिरवाळ असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानच्या डागडुजीचे काम सुरु असल्याने ते सध्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान ते आपल्या कुटुंबासह घराचे काम पाहण्यासाठी गेले. यावेळी वेळी बाळू बहिरवळ हा दरवाजा बंद करून आत गांजा पित होता.
advertisement
पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून तडकाफडकी निलंबित
पोलीस अधीक्षकांनी स्वतः खूप वेळ दरवाजा ठोठावून ही दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली. काही वेळानंतर बाळूने दरवाजा उघडला तेव्हा आत गांजाचा वास आला. दरम्यान तात्काळ पोलीस अधिक्षक यांनी शिवाजीनगर पोलिसांना बोलावून बाळू बहिरवाळची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी बाळूने गांजाचे सेवन केल्याचे अहवालातून समोर आल्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसचं पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले, यामुळे खळबळ उडाली.
advertisement
बीडची गुन्हेगारी
बीड जिल्हा खंडणी पॅटर्न, पीक विमा घोटाळा पॅटर्न, गावगुंड पॅटर्न यामुळे राज्यातच नाही तर देशाच्या केंद्रस्थानी आला आहे. पवनचक्की कंपनीत झालेल्या वादानंतर संतोष देशमुख यांची आरोपींनी निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होते. आरोपींना पोलीसच अभय देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अजून काही मोठे मासे आणि प्रत्यक्ष घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 05, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: SP च्या घरात गांजा ओढत बसला, दार वाजवलं तरी उघडेना; कॉवतसाहेबांची सटकली, थेट सस्पेन्डची ऑर्डर









