बीडमध्ये पावसाचा कहर, दुपारी ३ वाजता धरणातून सोडणार पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Last Updated:

मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून दुपारी 3 नंतर पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

News18
News18
बीड:   माजलगांव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पिकं पाण्याखाली गेले आहेत यामुळे कपाशी सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोथाळा , साळेगाव मोगरा, डाके पिंपरी, खतगव्हाण , उमरी,सिमरी पारगाव, पात्रुड ,नित्रुड , गंगामसला,किट्टी आडगाव, टाकरवण तालखेड या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. तसेच मांजरा प्रकल्प देखील ९० टक्के भरला आहे.
advertisement
बीड, धाराशिव, लातूर या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प 90% भरला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून दुपारी 3 नंतर पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे एकाच दिवसात हे धरण 36 टक्क्यावरून 90% पर्यंत पोहोचले.
advertisement

मांजरा धरणाचे दरवाजे उघडणार 

दुपारी 3 वाजता मांजरा धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत, अशी माहिती धरण अभियंता यांनी दिली. तिन्ही जिल्ह्यातील शेती सिंचन, पाणीपुरवठा व औद्योगिक वापरासाठी या धरणाचे पाणी वापरले जाते आता धरण 80 टक्के भरल्याने या ठिकाणचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे

advertisement
तरी, मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये पावसाचा कहर, दुपारी ३ वाजता धरणातून सोडणार पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement