बीडमध्ये तुफान राडा, मायलेकीसह 3 महिलांना बेदम मारहाण, 5 जणांकडून लोखंडी रॉडने हल्ला
- Reported by:SURESH JADHAV
- Written by:Ravindra Mane
Last Updated:
बीड जिल्ह्यात जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील मायलेकींसह तिघींवर लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्यात जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील मायलेकींसह तिघींवर लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
बीडच्या चऱ्हाटा गावामध्ये हा प्रकार घडला. जागेच्या जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका कुटुंबातील मायलेकी आणि अन्य एका महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लोखंडी पाईप आणि रॉडने या तिघींवर जीवघेणा हल्ला केला.
हा हल्ला सुरू असताना एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या व्हिडिओमध्ये आरोपी महिलांवर निर्दयीपणे हल्ला करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे, ज्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.
advertisement
या हल्ल्यात दोघी महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Aug 28, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये तुफान राडा, मायलेकीसह 3 महिलांना बेदम मारहाण, 5 जणांकडून लोखंडी रॉडने हल्ला








