Beed Crime : अपहरण करून दारू पाजली; मग सात तास डांबून मारहाण; बीडमध्ये अप्पा राठोड यांना अमानुष मारहाण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Crime News : चहा पाजतो, असा बहाणा करून अप्पा काशिनाथ राठोड माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेले. तेथे पाच ते सहा जणांनी दारू पाजली अन्...
Appa Rathod Beaten In Beed : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अपहरणाची आणि अमानुष मारहाणीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील अप्पा काशिनाथ राठोड या व्यक्तीला या भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. ही घटना १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. त्यामुळे आता बीडमधील गुन्हेगारी रोखणार कशी? असा सवाल पोलीस प्रशासनासमोर देखील उपस्थित होऊ लागला आहे.
सात तास राठोड यांना बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, चहा पिण्याच्या बहाण्याने अप्पा राठोड यांना दुचाकीवरून एका निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे ५ ते ६ जणांनी त्यांना दारू पाजून जबरदस्तीने वाहनातून अपहरण केले. त्यानंतर तब्बल सात तास राठोड यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला सात टाके पडले असून, त्यांच्या शरीरावर सर्वत्र जखमांचे आणि मारहाणीचे व्रण उमटले आहेत. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
व्हिडीओ देखील बनवला
या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे, कारण परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार पुन्हा घडला आहे. हे गुंड इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी अप्पा राठोड यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील बनवला आहे. हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी राठोड यांना दिली असल्याचे आप्पा यांनी स्वतः सांगितले आहे.
advertisement
सायंकाळी 6 वाजता अपहरण
अप्पा राठोड यांच्या म्हणण्यानुसार, १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे अपहरण करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता त्यांना सोडून देण्यात आले. या ९ तासांच्या काळात त्यांना खूप मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडीओ बनवण्यात आले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन एक पत्र दिले. मात्र, दुर्दैवाने अद्याप त्यांचा जबाब घेण्यासाठी कोणीही पोलीस आलेले नाही. "माझी सुट्टी संपताच मी स्वतःच तक्रार देणार आहे," असे आप्पा राठोड यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान, या गंभीर गुन्ह्यात अद्याप गुन्हा दाखल न होणे आणि पोलिसांकडून दिरंगाई होणे हे चिंतेची बाब आहे. या घटनेतील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई होणे आणि पीडिताला न्याय मिळवा, अशी मागणी केली जात आहे.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
May 21, 2025 7:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : अपहरण करून दारू पाजली; मग सात तास डांबून मारहाण; बीडमध्ये अप्पा राठोड यांना अमानुष मारहाण!










