महादेव मुंडेंच्या पोस्ट मॉर्टममध्ये शॉकिंग माहिती; श्वसननलिका कापली, तोंड, मान, हातावर 16 सपासप वार, क्रुरतेचा कळस!

Last Updated:

Mahadev Munde Post Mortem Report : 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला. 22 ऑक्टोबर रोजी सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चाललं. त्यातून हादरवणारी माहिती समोर आलीये.

Mahadev Munde Post Mortem Report
Mahadev Munde Post Mortem Report
Mahadev Munde Murder Case : बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. महादेव यांचा अगोदर गळा कापला. तब्बल २० सेंमीपर्यंत लांब, ८ सेंमी रुंद आणि ३ सेंमी खोल असा हा वार होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले. मुंडे यांच्या अंगावर तब्बल १६ वार आहेत. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे.

अंगावर जखमा झाल्याने मृत्यू

२१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. २२ ऑक्टोबर रोजी १२:१५ ते १:३० असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता. लाल करदोडा आणि पाकीट होते.
advertisement

सव्वा तास पोस्ट मॉर्टम

चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. सव्वा तास हे पोस्ट मॉर्टम चालले होते. २० महिन्यांनंतरही यातील आरोपी निष्पन्न नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या प्रकरणातील नवनवीन धक्कादायक माहिती असे समोर येत आहे.

समोरून वार केल्याने श्वासनलिका कापली

advertisement
दरम्यान, 3 डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने श्वासनलिका कापली गेली होती. शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केले होते. त्यामुळे आता महादेव मुंडे यांना न्याय कधी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
महादेव मुंडेंच्या पोस्ट मॉर्टममध्ये शॉकिंग माहिती; श्वसननलिका कापली, तोंड, मान, हातावर 16 सपासप वार, क्रुरतेचा कळस!
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement