Beed : अपहरण झालेल्या शिवराज दिवटेच्या मारहाणीचा आणखी एक Video, पाया पडायला लावलं, छातीवर बसला अन्...

Last Updated:

Beed Shivraj Divate beating Video : काल परळीतील शिवराज दिवटे नामक तरुणाचं अपहरण करून त्याला अमानुष लाठ्या, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती.

Beed Shivraj Divate beating Video
Beed Shivraj Divate beating Video
Beed Crime News : बीडच्या परळी मध्ये टोकवाडी परिसरातील रत्नेश्वर टेकडी येथे लिंबुटा येथील शिवराज दिवटे (Shivraj Divate beating Video) या युवकाला दहा ते बारा जणांनी रिंगण करून अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथकंही रवाना करण्यात आले आहेत. अशातच आणखी एक या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय.

मारहाणीचा दुसरा व्हिडीओ समोर

शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीत अमानुष मारहाण करणारे निर्दयी आरोपी मारहाण केल्यानंतर शिवराज याला सर्वांच्या पाया पडायला लावत आहेत. बीडच्या परळीत समाधान मुंडे आणि टोळीकडून मारहाण करताना पाय पडायला लावतानाचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शिवराज दिवटे मारहाण करणाऱ्यांसमोर दया याचिका करताना दिसतोय.
advertisement

मारहाणीचं कारण काय?

बीडच्या परळी मध्ये टोकवाडी परिसरातील रत्नेश्वर टेकडी येथे शिवराज दिवटेला मारहाण का झाली? असा प्रश्न विचारला जात होता. अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान इतर मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीये.
advertisement
advertisement

20 जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed : अपहरण झालेल्या शिवराज दिवटेच्या मारहाणीचा आणखी एक Video, पाया पडायला लावलं, छातीवर बसला अन्...
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement