Beed : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतलं विष, पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठा गोंधळ, न्याय कधी मिळणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Dnyaneshwari Munde took poison : महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dnyaneshwari Munde In SP office : बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. न्याय मिळत नसल्याने त्यांनी यापूर्वीच आत्मदहनाचा इशारा दिला होता. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांना आजपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
न्याय कधी मिळणार?
विष प्राशन केल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही, मात्र त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. अशातच आता न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
आत्मदहनाचा इशारा
advertisement
महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे वारंवार करत होत्या. गेल्या दीड वर्षांपासून त्या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या. न्याय मिळत नसल्याने त्यांनी यापूर्वीच आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज त्यांनी हा गंभीर निर्णय घेत पोलीस अधीक्षक कार्यालयातच हे टोकाचे पाऊल उचलल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
advertisement
महादेव मुंडे यांची हत्या
महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी शहरातील तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. 20 ऑक्टोबर 2023 रोजी ते मुलांना ट्यूशनमधून घरी सोडून गेले होते. त्यानंतर रात्री त्यांचे रक्त लागलेले मोटरसायकल वन विभागाच्या कार्यालयाजवळ सापडले. दुसऱ्या दिवशी सकाळी (21 ऑक्टोबर) त्यांचा मृतदेह मोटरसायकलपासून 50 मीटर अंतरावर सापडला. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार, त्यांचा गळा चिरण्यात आला होता आणि त्यांच्या शरीरावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या प्रकरणाला 18 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
July 16, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतलं विष, पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठा गोंधळ, न्याय कधी मिळणार?


