Gram Panchayat Election : धनुभाऊंनी मैदान मारले; पंकजा मुंडेंना मोठा धक्का
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
ग्रामपंचायत निवडणूक निकालात धनंजय मुंडे गटानं पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे.
बीड, 6 नोव्हेंबर : रविवारी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मतदान झालं. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता ग्रामपंचायत निकालांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांचं वर्चस्व दिसून येत आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं होतं. या ग्रामपचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. सहा पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये धनंजय मुंडे गटानं विजय मिळवला आहे. तर अवघ्या एक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे.
रोहित पवारांना धक्का
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. कर्जत तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायती तर जामखेड तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती.
advertisement
यामध्ये कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून सर्वच्या सर्व सहाही ठिकाणी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. तर जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमध्ये मधील दोन ग्रामपंचायती या आमदार रोहित पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाला मिळाल्या आहेत. तर एका ग्रामपंचायतीवर राम शिंदे यांनी भाजपचा झेंडा फडकवला आहे.
advertisement
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल म्हणून निवडणूक लढवली जाते, त्यामुळे कोणाताही गट हा पक्षाच्या तिकीटावर प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही. या पॅनलला राजकीय पक्षांचं समर्थन असतं.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
Nov 06, 2023 1:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Gram Panchayat Election : धनुभाऊंनी मैदान मारले; पंकजा मुंडेंना मोठा धक्का









