Maharashtra Election 2024 : महायुतीला धक्का, भाजपाचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार
- Published by:Suraj
Last Updated:
Shivsangram Party : घटक पक्षाला बळ देण्याच तर सोडाच पण सोबत घेऊन जाण्याचं काम देखील भाजप करत नाही त्यामुळे शिवसंग्राम स्वतंत्र भूमिका घेईल असं ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीला पहिला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत स्वबळाचा नारा दिला. यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडलीय. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर केलंय. शिवसंग्रामच्या ज्योती विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
advertisement
महायुतीची शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची भूमिका दिसत नाहीत. आमच्या समोर सर्व पर्याय खुले आहेत. राज्यातील पाच जागावर शिवसंग्राम निवडणूक लढवणार आहे. घटक पक्षाला बळ देण्याच तर सोडाच पण सोबत घेऊन जाण्याचं काम देखील भाजप करत नाही त्यामुळे शिवसंग्राम स्वतंत्र भूमिका घेईल असं ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे.
विनायक मेटे यांचं निधन झाल्यानंतर शिवसंग्रामला सत्तेत वाटा मिळाला नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही सुटला नाही. शिवसंग्रामचा राजकीय पटलावरती विचार केला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनाही मिळाला नाही. घटक पक्षाला बळ देण्याच तर सोडाच पण सोबत घेऊन जाण्याचं काम देखील भाजप करत नाही असा घणाघात ज्योती मेटे यांनी केला.
advertisement
शिवसंग्राम ज्यांच्या सोबत असेल ते विजयापर्यंत जातील. शिवसंग्राम सोबत नसेल त्यांचा पराभव होईल. आरक्षणाच्या प्रश्नावर मराठवाड्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता मतपेटीतून बाहेर पडेल. गरज सरो आणि वैद्य मरो ही भाजपाची, महायुतीची भूमिका आहे आणि त्याची सल मनात असल्याची भावना ज्योती मेटे यांनी व्यक्त केली.
लोकसभा हे आमचे ध्येय नव्हतं. विधानसभेची तयारी आमचे पूर्ण झालेले आहे. शाश्वत विकास मेटे साहेबांनी मांडला. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मनोज जरांगे पाटील यांची भेट बीड विधानसभा संदर्भात होती. विधानसभा निवडणुकीच्या रणनीती अनुषंगाने आमची सकारात्मक चर्चा झाली. महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत देण्यासाठी अनुकूल नसेल तर शिवसंग्राम स्वतंत्र लढणार असल्याचंही ज्योती मेटे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 18, 2024 9:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Maharashtra Election 2024 : महायुतीला धक्का, भाजपाचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार









