फटाके वाजवताना केली छोटी चूक, चिमुकल्याची दृष्टी हिरावली, बीडच्या राजेशची भयंकर अवस्था

Last Updated:

फटाके फोडण्याचा आनंद बीड येथील एका ८ वर्षीय मुलासाठी आयुष्यभराची शिक्षा देणारा ठरला आहे. फटाके फोडताना केलेली एक छोटी चूक या मुलासाठी आयुष्यभराची जखमी ठरली आहे.

News18
News18
बीड: सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. कुठे दिवे, कुठे विद्युत रोषणाई लावून तर कुठे फटाके फुटून दिवाळीचा आनंद घेतला जात आहे. पण हाच क्षणभराचा आनंद बीड येथील एका ८ वर्षीय मुलासाठी आयुष्यभराची शिक्षा देणारा ठरला आहे. फटाके फोडताना केलेली एक छोटी चूक या मुलासाठी आयुष्यभराची जखमी ठरली आहे. या अपघातात मुलाची दृष्टी हिरावली आहे. त्या आता आयुष्यात कधीच बघता येणार नाही.
ही हृदयद्रावक घटना बीड शहरात घडली आहे. राजेश राजेंद्र शिकलकरी (वय ८, रा. नागोबा गल्ली, बीड) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. फटाके न फुटल्याने त्यातील दारू जमा करण्याचा आणि ती पेटवण्याचा प्रयत्न या मुलाने केला होता. पण ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. फटाक्यांची दारू अचानक पेटल्याने राजेशचा चेहरा गंभीररित्या भाजला. त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाल्याने त्याला दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, राजेशच्या डोळ्यातील ‘कॉर्निया’ (Cornea) या महत्त्वाच्या भागाला गंभीर इजा झाली आहे, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. संजय जानवळे यांनी दिली आहे. या गंभीर दुखापतीमुळे या बालकावर दृष्टी गमावण्याची वेळ येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
डॉ. जानवळे यांनी या घटनेच्या निमित्ताने सर्व पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडताना अत्यंत काळजी घ्यावी. विशेषतः लहान मुले फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. लहान मुलांना स्वतःहून फटाक्यांशी खेळू देऊ नये आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, जेणेकरून अशा गंभीर दुर्घटना टाळता येतील, असे डॉ. जानवळे यांनी स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
फटाके वाजवताना केली छोटी चूक, चिमुकल्याची दृष्टी हिरावली, बीडच्या राजेशची भयंकर अवस्था
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement