बीडमध्ये बिंदुसरा धरणावर तरुणाची स्टंटबाजी; वाहून जाताना थोडक्यात बचावला, थरकाप उडवणारा VIDEO

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, यापैकी काही उत्साही तरुण पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ जाऊन स्टंटबाजी करत आहेत.
असाच एक तरुण पाण्याच्या वेगवान प्रवाहाजवळ स्टंट करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो काही अंतरापर्यंत वेगाने वाहत गेला. पण सुदैवाने प्रवाहात एक मोठा दगड असल्याने तरुणाने त्याला पकडलं आणि स्वत:चा जीव वाचवू लागला. पण पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला जागेवरून हलता येत नव्हतं. त्याचा जीव धोक्यात असल्याचे पाहून परिसरात उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून या वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवलं आहे.
advertisement
हा सगळा प्रकार उपस्थितांपैकी एकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या व्हिडीओत संबंधित तरुण वाहून जाताना दिसत आहे. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विशेषतः, अशा धोकादायक ठिकाणी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करणे किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज आहे. थोडक्यात बचावलेल्या या तरुणाची ओळख अद्याप समोर आलेली नाही, परंतु या घटनेने अशा ठिकाणी पर्यटकांनी आणि तरुणांनी अधिक काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये बिंदुसरा धरणावर तरुणाची स्टंटबाजी; वाहून जाताना थोडक्यात बचावला, थरकाप उडवणारा VIDEO
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement