Bhiwandi Accident : खड्ड्यामुळे तोल गेला, थेट कंटेनरच्या चाकाखाली आला अन्...भयंकर अपघाताने शहर हादरलं

Last Updated:

कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या राज सिंगची गाडी खड्ड्यात आदळून त्याचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्यानंतर भरधाव कंटेनर खाली चिरडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी कल्याण मार्गावरील टेमघर परिसरात साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली आहे.

Bhiwandi Accident
Bhiwandi Accident
Bhiwandi Accident : नरेश पाटील, भिवंडी : भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत खड्ड्यामुळे आणखी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज निरंजन सिंग असे या 19 वर्षीय तरूणाचे नाव आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या राज सिंगची गाडी खड्ड्यात आदळून त्याचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्यानंतर भरधाव कंटेनर खाली चिरडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी कल्याण मार्गावरील टेमघर परिसरात साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने सिंग कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचसोबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खरं तर गेल्या काही दिवसापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि भिवंडी बाय पास रोड वाहतुक कोंडी आणि अपघातांमुळे प्रचंड चर्चेत आहेत.दोनच दिवसांपूर्वी एका कंटेनर खाली पडून एका मुलाचा मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आता अशीच एक घटना घडली आहे.भिवंडीतील खड्ड्यांनी पुन्हा एकदा तरुणाचे आयुष्य हिरावले आहे.
राज निरंजन सिंग हा तरूण आपल्या मित्रासह आज दुपारच्या सुमारच्या दुचाकीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. यावेळी भिवंडी कल्याण मार्गावरून प्रवास करताना त्याच्या बाजूनेच एक कंटेनरही जात होता. या दरम्यान रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे या खड्डयात आदळून त्याची गाडी उलटली होती.यावेळी राज सिंग थेट कंटेनरच्या खाली गेला होता.त्यामुळे कंटेनर खाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.त्याचवेळी त्याचा मित्र विरुद्ध दिशेला पडल्यामुळे तो या अपघातातून बचावला होता.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राज सिंग यांच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला होता.
advertisement
या प्रकरणी कंटेनर चालका विरूद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालका विरूद्ध गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सूरू केला आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi Accident : खड्ड्यामुळे तोल गेला, थेट कंटेनरच्या चाकाखाली आला अन्...भयंकर अपघाताने शहर हादरलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement