Bhiwandi Crime : आधी अत्याचार, मग दगडाने ठेचलं, भिवंडीत नराधमाच वृद्ध महिलेसोबत राक्षसी कृत्य
- Published by:Prashant Gomane
- local18
Last Updated:
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.
Bhiwandi Crime News : नरेश पाटील, भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. चावे भरे गावात दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.या घटनेनंतर भिवंडीत एकच खळबळ माजली आहे.तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सूरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील चावे भरे गावातील मृत 65 वर्षीय महिला ही शेतावर काम करत होती.आज दुपारच्या 12 वाजताच्या सुमारास शेतावर काम करत असताना अज्ञाताने पहिल्यांदा वृद्ध महिलेवर हात टाकून तिच्यावर अत्याचार केले.यानंतर घटनेची वाच्यता कुठे होऊ नये यासाठी अज्ञाताने दगडाने ठेचून महिलेच्या हत्या केली,अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
दरम्यान काही स्थानिकांनी महिलेला मृत पाहून पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.त्यानुसार गणेशपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला होता. यावेळी पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन, उत्तर तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.आता महिलेची नेमकी हत्या कशी झाली आहे? तसेच तिच्यावर अत्याचारासारखी घटना घडली आहे का?या गोष्टींची माहिती समोर येणार आहे.
advertisement
या घटनेनंतर गणेशपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सूरू केला आहे. त्यामुळे हा आरोपी कोण आहे? त्याने वृद्ध महिलेवर खरंच अत्याचार केला आहे? या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 28, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi Crime : आधी अत्याचार, मग दगडाने ठेचलं, भिवंडीत नराधमाच वृद्ध महिलेसोबत राक्षसी कृत्य


