फलटण ग्रामीण पोलिसांचा एक धक्कादायक कारनामा, छळ छावणीचं भयावह वास्तव समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
साखर सम्राट आणि फलटण ग्रामीण पोलिसांच्या छळ छावणीचं भयावह वास्तव समोर आलं.
सातारा : मृत महिला डॉक्टरची फलटण ग्रामीण पोलिसांविरोधातल्या तक्रारीनं खळबळ उडाली आहे. त्यानंतर फलटण पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. ऊसतोड मजुरांवरील गुन्ह्यात सर्वत्र एकच वर्णन आहे. केवळ वाहन आणि पैशाची रक्कम बदलून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकसारख्या वर्णनाचे FIR न्यूज18 लोकमतच्या हाती लागले आहेत.
साखर सम्राट पोलिसांच्या मदतीनं कायद्याचा गैरवापर करून ऊसतोड मजूर मुकादमांवर तक्रारी दाखल करत असल्याचं बोललं जात आहे.. यासंदर्भात गेल्या दोन वर्षातले पाच FIR रिपोर्ट समोर आले आहे. विशेष म्हणजे तक्रारदार आणि आरोपींची नावं सोडली FIR मध्ये सर्व मजकूर एकसारखाच आहे. पोलिसांकडून आरोपींच्या चुकीच्या वैद्यकीय अहवालासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडितेनं यापूर्वीच केला होता. त्याचसोबत फलटण पोलिसांच्या भूमिकेवर तिच्या कुटुंबियांकडूनही संशय व्यक्त केला जात आहे, असं असताना साखर सम्राट आणि फलटण ग्रामीण पोलिसांच्या छळ छावणीचं भयावह वास्तव समोर आलं.
advertisement
फलटण ग्रामीण पोलिसांचा आणखी एक धक्कादायक कारनामा
पोटाची खळगी भरण्यासाठी बीडहून पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या ऊसतोड मजूर आणि मुकादमांवर धाकदटपशाही सुरू होती.. यासाठी साखर सम्राट कायद्याचा चुकीचा वापर करत असल्याचं समोर आलं. यानिमित्तानं आधीच आरोपांच्या फेऱ्यात आसलेल्या फलटण ग्रामीण पोलिसांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला.
जून 2025मध्ये दाखल करण्यात आलेल्या दोन FIRमध्ये काय साम्य?
advertisement
FIR - 1
- तारीख - 17/06/2025
- भारतीय दंड संहिता 1860 - कलम 420, 467, 468, 471, 504, 506, 34
- तक्रारदार - प्रदीप मोहिते, मॅनेजर, स्वराज ग्रीन पॉवर
- यांच्याविरोधात तक्रार - राजेश जाधव, रामचंद्र कोकणे
- तक्रारीत काय - करारनाम्यानुसार वाहनं हजर केली नाही, कारखान्याची फसवणूक
FIR - 2
- तारीख - 18/06/2025
- भारतीय दंड संहिता 1860 - कलम 420, 467, 468, 471, 504, 506, 34
- तक्रारदार - प्रदीप मोहिते, मॅनेजर, स्वराज ग्रीन पॉवर
- यांच्याविरोधात तक्रार -धनंजय काळे,दशरथ ढवळे
- तक्रारीत काय -करारनाम्यानुसार वाहनं हजर केली नाही, कारखान्याची फसवणूक
advertisement
सर्व तक्रारी एक सारख्याच कशा?
फलटणच्या स्वराज कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून ऊसतोड कामगार मुकादमांविरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या. आश्चर्य म्हणजे लिहिलेल्या तक्रारीतला मजकूर सारखाच आहे. तक्रारीत लावण्यात आलेली कायदेशीर कलमंही सारखीच आहे. याच वर्षीचं नाही तर गेल्या काही वर्षात दाखल झालेल्या तक्रारी एक सारख्याच कशा असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
October 28, 2025 8:14 PM IST


