तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ, सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की
- Published by:Prachi Amale
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून बाचाबाची आणि धक्काबुक्कीने प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
धाराशिव : तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ आला आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की झाली. मातंग समाजाच्या आरक्षण मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेची तुळजापुरात साकडं यात्रा काढण्यात आलं होती. तुळजाभवानीला आरती करून आरक्षणाचे मागणीसाठी साकडं घालण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते तुळजापुरात आले होते. मंदिर सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की आले होते. मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून बाचाबाची आणि धक्काबुक्कीने प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
धाराशिव तुळजापूरमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना तुळजाभवानी मंदिरासमोर आरती करण्यास अडवल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. न्यायालयाने निकाल देऊन ही राज्य सरकार मातंग समाजाच्या आरक्षणाबाबत चालढकल करत असून आम्ही हिंदू धर्मात असताना देखील आम्हाला हिंदूवादी सरकार असून सुद्धा आमच्या प्रश्नाकडे चालढकल करत असल्याने आता आम्हाला हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जाण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
advertisement
कार्यकर्त्यांनी निषेध
आमची मागणी तर मान्य करायची सोडून सरकार हमाली तुळजाभवानी मंदिराकडे येण्यासाठीच अडवणूक करत असून ही निषेधाची गोष्ट असल्याचं सांगत त्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. एवढंच नाही तर आई तुळजाभवानीला आरती करत सरकारला बुद्धी येण्यासाठी साकडे देखील कार्यकर्त्यांनी घातला आहे.
सुरक्षा रक्षकाने अडवल्याने गोंधळ आणि धक्काबुक्की
advertisement
न्यायालयाने निर्णय देऊनही मातंग समाजाच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेत नसल्याने मातंग समाज आक्रमक झाला आहे. कळंब ते तुळजापूर मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पायी रॅली काढली होती. पायी रॅली तुळजापुरात आल्यावर सुरक्षा रक्षकाने अडवल्याने गोंधळ आणि धक्काबुक्की झाली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 01, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ, सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की