advertisement

Chalisgaon Firing : गोळीबाराने महाराष्ट्र पुन्हा हादरला, कार्यालयात घुसून भाजप नेत्यावर 4 राऊंड फायर, Video

Last Updated:

उल्हासनगर पोलीस स्टेशनमधलं गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भाजपच्या माजी नगरसेवकावर चार राऊंड फायर केले.

ोळीबाराने महाराष्ट्र पुन्हा हादरला, कार्यालयात घुसून भाजप नेत्यावर 4 राऊंड फायर, CCTV
ोळीबाराने महाराष्ट्र पुन्हा हादरला, कार्यालयात घुसून भाजप नेत्यावर 4 राऊंड फायर, CCTV
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
चाळीसगाव : जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारे सर्व मारेकरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या पायाला तीन ते चार गोळ्या लागल्याची माहिती आहे. महेंद्र उर्फ बाळू मोरे असं भाजपच्या माजी नगरसेवकाचं नाव आहे.
सात ते आठ अज्ञात इसमांनी केलेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महेंद्र मोरे यांच्यावर चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
महेंद्र मोरे त्यांच्या कार्यालयात असताना सात ते आठ जण शिरले. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात महेंद्र मोरे जखमी झाले. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर चाळीसगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात शिरलेल्या सगळ्यांनी कापड टाकून तोंड झाकलं होतं. गोळीबार केल्यानंतर हे सगळे पुन्हा एकदा गाडीत बसले आणि निघून गेले.
advertisement
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. गोळीबाराची ही घटना ताजी असतानाच आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chalisgaon Firing : गोळीबाराने महाराष्ट्र पुन्हा हादरला, कार्यालयात घुसून भाजप नेत्यावर 4 राऊंड फायर, Video
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement